धाराशिव: शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी धाराशिव-कळंब मतदारसंघातून आमदार कैलास यांची अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. या घोषणेनंतर आ. कैलास यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे भावना व्यक्त केल्या आहेत.
आ. कैलास यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे तसेच खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि महाविकास आघाडीतील नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव-कळंब मतदारसंघातून आपली उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.”
ते पुढे म्हणाले, “गेल्या पाच वर्षांत धाराशिव-कळंब मतदारसंघात केलेल्या विकासकामांमुळे मतदारांचा विश्वास जिंकता आला. भविष्यातही कर्तव्यनिष्ठ आणि प्रामाणिकपणे कार्यरत राहण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. यावेळीही धाराशिव-कळंबची जनता त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असा त्यांना विश्वास आहे.”
या पोस्टद्वारे आ. कैलास यांनी कार्यकर्ते, मतदार आणि पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.