धाराशिव: तुळजापूर पोलीस स्टेशनमधील पोलीस कॉन्स्टेबल राहुल बाबुराव खटके यांनी श्री मुक्ताई मार्ट प्रा. लि. या धाराशिव येथील दुकानातून कपडे खरेदी केले होते. मात्र, मुक्ताई मार्टने त्यांना खरेदीच्या बिलावर पॉइंट दिले नाहीत. यामुळे राहुल खटके यांनी अॅड. देविदास वडगांवकर यांच्या मार्फत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग धाराशिव येथे तक्रार दाखल केली.
आयोगाचे अध्यक्ष अमोल गिराम आणि सदस्य श्रीमती वैशाली बोराडे यांच्यासमोर या तक्रारीची सुनावणी झाली. सुनावणीनंतर आयोगाने तक्रारदार राहुल खटके यांची तक्रार मंजूर केली. श्री. मुक्ताई मार्ट प्रा. लि. यांना तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रु. 5000/- आणि तक्रारीचा खर्च म्हणून रु. 5000/- असे एकूण रु. 10,000/- द्यावेत असे आदेश दिले आहेत.
मुक्ताई मार्टला हे आदेश 45 दिवसांत पूर्ण करावे लागणार आहेत. या प्रकरणात अॅड. अविनाश मैदरकर यांनी सहकार्य केले.