धाराशिव – बोधिसत्व विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी मुकुंद अर्जुनराव घुले यांची निवड करण्यात आली आहे. समितीचे मार्गदर्शक धनंजय शिंगाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली. यावर्षीची भव्य मिरवणूक 27 एप्रिल रोजी काढण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. या वेळी सर्वधर्मीय समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समिती गेल्या 30 वर्षांपासून धाराशिव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करत आहे. विविध समाजोपयोगी उपक्रमांमुळे हा उत्सव विशेष महत्त्वाचा ठरतो. यामध्ये रक्तदान शिबिरे, रुग्णांना फळे वाटप, वृक्षलागवड, दिव्यांगांना मोफत सायकल वितरण यांसारखे उपक्रम राबविले जातात. यंदाही विविध राज्यांतील पारंपरिक वाद्य समूहांना आमंत्रित करण्यात आले असून, त्यामुळे मिरवणुकीला खास वैशिष्ट्य प्राप्त होणार आहे.
यावर्षीच्या जयंती उत्सव समितीमध्ये सर्व जाती-धर्मातील व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. अध्यक्षपदी मुकुंद अर्जुनराव घुले, कार्याध्यक्षपदी संजय मुंडे, उपाध्यक्षपदी खलील सय्यद, अर्जुन पवार, सचिवपदी नाना घाटगे, कोषाध्यक्षपदी विशाल शिंगाडे, सहसचिवपदी रावसाहेब शिंगाडे यांची निवड करण्यात आली. तसेच संरक्षण प्रमुखपदी पांडुरंग भोसले, बंडू आदरकर, चंद्रकांत पांढरे, संतोष क्षीरसागर, संजय थोरात यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
मिरवणूक प्रमुख म्हणून सागर भास्कर, प्रतीक शिंगाडे, जितेंद्र बनसोडे, स्वप्निल शिंगाडे यांची निवड झाली आहे. सांस्कृतिक प्रमुख म्हणून दयानंद साबळे, प्रेमानंद सपकाळ, यशवंत शिंगाडे, प्रसेंजित शिंगाडे , सारीपुत शिंगाडे यांची नियुक्ती झाली आहे. प्रमुख सल्लागार म्हणून परवेज काझी, राजेंद्र अत्रे, सुभाष पवार, नंदकुमार शेटे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच कायदेविषयक सल्लागार म्हणून ॲड. राकेश पवार आणि ॲड. भय्याजी साबणे यांची जबाबदारी ठरविण्यात आली आहे.