• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, March 3, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव: वाघोलीत क्रूर कृत्य! लैंगिकतेवरून चिडवल्याच्या रागातून मजुराचा लोखंडी पाईपने ठेचून खून; दोघे गंभीर जखमी

admin by admin
November 21, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक
0
SHARES
2.5k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव  – तालुक्यातील वाघोली शिवारात असलेल्या एका स्टोन क्रेशरवर काम करणाऱ्या मजुरांमध्ये क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान खुनात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लैंगिकतेवरून चिडवल्याचा राग मनात धरून एका मजुराने आपल्याच सहकाऱ्याचा लोखंडी पाईपने डोके फोडून निर्घृण खून केला. ही घटना २० नोव्हेंबर रोजी घडली असून, या हल्ल्यात अन्य दोघे जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली शिवारात ‘अजमेरा स्टोन क्रेशर’ आहे. या ठिकाणी झारखंड राज्यातील काही मजूर काम करतात व तिथेच पत्र्याच्या शेडमध्ये राहतात. आरोपी सुमितकुमार सत्येंद्र सिंग (रा. उपर हटिया पिठ्याटोली, जि. रांची, झारखंड) आणि मयत सुनिल गांगु कुजुर (वय ३१, रा. रांची, झारखंड) हे दोघेही येथेच वास्तव्यास होते.

२० नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास मयत सुनिल कुजुर याने आरोपी सुमितकुमार याला लैंगिकतेवरून चिडवले. या गोष्टीचा प्रचंड राग आल्याने आरोपी सुमितकुमार याने तिथे पडलेला एक चौकोनी लोखंडी पाईप उचलला आणि सुनिलच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. हा मार इतका वर्मी लागला की यामध्ये सुनिल कुजुर याचा जागीच मृत्यू झाला.

आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने या वादात मध्यस्ती करणाऱ्या किंवा तिथे उपस्थित असलेल्या अन्य मजुरांवरही हल्ला चढवला. यात धनेश खासा मुंडा (रा. रांची) यालाही लोखंडी पाईपने मारून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच फिर्यादी मागन करोम लोहरा (वय ६७, रा. जि. खुटी, झारखंड) यांनाही मारहाण करून जखमी केले.

याप्रकरणी जखमी मागन लोहरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी सुमितकुमार सत्येंद्र सिंग याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) (खून), १०९(१) (खुनाचा प्रयत्न) आणि ११८(१) (दुखापत करणे) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

 

Previous Post

‘ड्रग्ज माफिया’ला नगराध्यक्ष बनवण्याचे स्वप्न आणि राणा पाटलांची ‘मजबुरी’!

Next Post

तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे वृद्ध महिलेचा खून

Next Post
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे वृद्ध महिलेचा खून

ताज्या बातम्या

वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

शेतरस्त्याच्या वादातून शेतकऱ्याला बेदम मारहाण; केशेगाव येथील ५ जणांवर गुन्हा दाखल

March 1, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

तामलवाडीत हादरवणारी घटना: अनैतिक संबंधांच्या संशयातून सख्या चुलत्याकडूनच १३ महिन्यांच्या पुतणीची निर्घृण हत्या

March 1, 2026
धाराशिव झेडपी सत्तानाट्य: मल्लू नेरुळकरच्या ‘पेड’ कार्यकर्त्यांची पोलखोल; राजन साळवींनी राणा पाटलांना फोटोतून केले ‘कट’… म्हटले शिवसेना अभेद्य …

धाराशिव झेडपी सत्तानाट्य: मल्लू नेरुळकरच्या ‘पेड’ कार्यकर्त्यांची पोलखोल; राजन साळवींनी राणा पाटलांना फोटोतून केले ‘कट’… म्हटले शिवसेना अभेद्य …

March 1, 2026
‘येड्यागत कारभार… किती खोट्या बातम्या पेरणार?’; युवासेना नेते अविनाश खोपे-पाटलांचा आमदार राणा पाटलांवर घणाघात

‘येड्यागत कारभार… किती खोट्या बातम्या पेरणार?’; युवासेना नेते अविनाश खोपे-पाटलांचा आमदार राणा पाटलांवर घणाघात

February 28, 2026
धाराशिव जिल्हा परिषद : सत्तेचा तिढा कायम…

धाराशिव जिल्हा परिषद : सत्तेचा तिढा कायम…

February 28, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group