• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, March 2, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

मुरूममध्ये अवैध गुटखा विक्री करणाऱ्यावर कारवाई; दुचाकीसह ५० हजारांचा मुद्देमाल जप्त

admin by admin
January 1, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल
0
SHARES
318
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

मुरूम: शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची अवैध विक्री करण्यासाठी साठा बाळगल्याप्रकरणी मुरूम पोलिसांनी एका ५५ वर्षीय इसमावर कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी गुटखा आणि दुचाकी असा एकूण ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मुरूम शहरातील अक्कलकोट रोडवरील श्रीराम मंगल कार्यालयासमोर ही कारवाई करण्यात आली. आरोपी मुन्ना ईस्माईल नुरसे (वय ५५, रा. आनंदनगर, ता. उमरगा, जि. धाराशिव) हा आपल्या दुचाकीवरून प्रतिबंधित गुटखा विक्रीच्या उद्देशाने घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार मुरूम पोलीस ठाण्याच्या पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला केशरयुक्त विमल पान मसाला आणि व्ही-१ तंबाखू आढळून आला. पोलिसांनी हा गुटखा आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी पोलीस पथकाने दिलेल्या फिर्यादीवरून मुरूम पोलीस ठाण्यात आरोपी मुन्ना नुरसे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २२३, २७४ आणि २७५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मुरूम पोलीस करत आहेत.

 

 

Previous Post

 धाराशिव जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ; महिलांचे दागिने, दुचाकी आणि जनावरांसह लाखोंचा ऐवज लंपास

Next Post

मल्लूचा माज आणि आईस्क्रीमचा ‘कोन’!

Next Post
“ओम्या, शेमडं पोरं… तुझी औकात काय?” भाजप आमदार पुत्राची जीभ घसरली

मल्लूचा माज आणि आईस्क्रीमचा 'कोन'!

ताज्या बातम्या

वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

शेतरस्त्याच्या वादातून शेतकऱ्याला बेदम मारहाण; केशेगाव येथील ५ जणांवर गुन्हा दाखल

March 1, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

तामलवाडीत हादरवणारी घटना: अनैतिक संबंधांच्या संशयातून सख्या चुलत्याकडूनच १३ महिन्यांच्या पुतणीची निर्घृण हत्या

March 1, 2026
धाराशिव झेडपी सत्तानाट्य: मल्लू नेरुळकरच्या ‘पेड’ कार्यकर्त्यांची पोलखोल; राजन साळवींनी राणा पाटलांना फोटोतून केले ‘कट’… म्हटले शिवसेना अभेद्य …

धाराशिव झेडपी सत्तानाट्य: मल्लू नेरुळकरच्या ‘पेड’ कार्यकर्त्यांची पोलखोल; राजन साळवींनी राणा पाटलांना फोटोतून केले ‘कट’… म्हटले शिवसेना अभेद्य …

March 1, 2026
‘येड्यागत कारभार… किती खोट्या बातम्या पेरणार?’; युवासेना नेते अविनाश खोपे-पाटलांचा आमदार राणा पाटलांवर घणाघात

‘येड्यागत कारभार… किती खोट्या बातम्या पेरणार?’; युवासेना नेते अविनाश खोपे-पाटलांचा आमदार राणा पाटलांवर घणाघात

February 28, 2026
धाराशिव जिल्हा परिषद : सत्तेचा तिढा कायम…

धाराशिव जिल्हा परिषद : सत्तेचा तिढा कायम…

February 28, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group