नळदुर्ग – धाराशिव शहर आणि जिल्ह्यात मागील काही दिवसापासून चोऱ्या आणि घरफोडीत मोठी वाढ झाली आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने एका अट्टल चोरट्यास अटक करून, नळदुर्ग पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील मालाविषयक गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेवून मालाविषयक गुन्हे उघड व पाहिजे फरारी आरोपीचा शोध घेणे कामी पेट्रोलींग करीता रवाना होवून तामलवाडी येथे आले असता पथकास पोलीस ठाणे नळदुर्ग येथील गुरनं 216/2024 कलम 457, 380 भा.दं.वि.सं. या गुन्ह्यामधील आरोपी नामे नितीन बाबु उर्फ बापू भोसले (रा. बिस्मीला नगर बरड गल्ली, मुळेगाव रोड सोलापूर ) याचे फिंगरप्रींट आले आहे अशी माहिती सपोनि एस.ए. कराळे क. तज्ञ आयकर युनिट धाराशिव यांनी फोनवरुन कळविल्याने पथकाने लागलीच नमुद ठिकाणी जावून नमुद आरोपीचा शोध घेतला असता त्याचे घराजवळ एक इसम पथकास मिळून आला.
पथकाने त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव नितीन बाबु उर्फ बापू भोसले वय 30 वर्षे, रा. बिस्मीला नगर बरड गल्ली, मुळेगाव रोड सोलापूर असे सागिंतले त्यावर पथकाने नमुद आरोपीकडे गुन्ह्या संदर्भात चौकशी केली असता त्यानी उडवाउडवीचे उत्तरे दिली त्यास अधिक विश्वास घेवून चौकशी केली असता त्यानी सागिंतले की मी व पिंटु जग्या भोसले रा कारेफळे यांनी मिळून मागील तीन चार महिन्यापासून काळेगाव, जळकोट अणदुर या गावात मोटरसायकलवरून जावून बंद घरे फोडून चोऱ्या केल्या असे सागिंतल्यावरुन पथकाने गुन्हे अभिलेखाची पाहणी करता 1) पोलीस ठाणे नळदुर्ग गुरनं 216/2024 कलम 457,380 भा.दं.वि.सं, 66/2024 कलम 457, 380 भा.दं.वि.सं, 73/2024 कलम 457, 380 भा.दं.वि.सं, पोलीस ठाणे तामलवाडी गुरनं 24/2024 457, 380 भा.दं.वि.सं प्रमाणे गुन्हे नोंद असुन नमुद गुन्ह्यात पाहिजे आरोपी असल्याची खात्री झाल्याने दोन पंचा समक्ष नमुद आरोपीच्या ताब्यातुन नमुद गुन्ह्यातील 20 ग्रॅम वजनाची सोन्याचे दागिने एकुण 75,000 ₹ किंमतीचे दि. 30.06.2024 रोजी जप्त करुन पुढील कार्यवाही कामी नमुद आरोपीस नळदुर्ग पोलीसांच्या ताब्यात दिले.
परंड्यात अवैध कत्तल खान्यावर छापा गुन्हा दाखल
परंडा शहरातील कुरेशी गल्ली दर्गा रोड येथे लतिफा कुरेशी हे त्यांच्या राहते घराच्या पाठीमागे गोवंशीय जनावरांची कत्तल चालू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने परंडा पोलीस ठाण्याचे पथक पोलीस निरीक्षक श्री विनोद इज्जपवार, सहा पोलीस निरीक्षक मुसळे, सहा पोलीस निरीक्षक सुर्वे, पोलीस हवालदार/1468 शेख असे सदर ठिकाणी रवाना होउन अवैध कत्तल खान्यावर छापा टाकला. सदर छापा कारवाई मध्ये सदर ठिकाणी काही इसम मिळून आले असता त्यांना त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 1) शाहरुख राजु शेख वय 22 वर्षे, 2) अरबाज राजू शेख, वय 21 वर्षे, दोघे रा.शेकापुर ता. भुम ह.मु. कुरेशी गल्ली, परंडा, ता. परंडा, जि. धाराशिव असे मिळून आले.
सदर छापा कारवाई दरम्यान पोलीस पथकाने नमुद कत्तलखान्यामध्ये मिळून आलेले अंदाजे 1,690किलो वजनाचे गोवंशीय जातीचे जर्शी गायीचे वासरांचे मांस व कातडी असे एकुण 3,38,000 ₹किंमतीचे नमुद आरोपीच्या ताब्यात मिळून आले ते जप्त करण्यात आले आहे. सदर जप्त करण्यात आलेले गोवंशीय जातीचे जर्शी गायीचे वासरांचे नमुने प्रयोगशाळा परिक्षणाकरीता पशुधन विकास अधिकारी, परंडा डॉ. पल्ला यांच्या मार्फतीने मांसाचे नमूने काढले आहेत. या प्रकरणी पोलीस हवालदार नितीन गुंडाळे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो ठाणे येथे गुरनं 139/2024 कलम 429 भ.दं.वि.सं. महाराष्ट्र प्राणि संरक्षण कायदा कलम- 5(क), 9(अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.