नळदुर्ग येथील अक्कलकोट रस्त्यालगत बी.के. फंक्शन हॉलसमोर गांजा सेवन करताना एक आरोपी नळदुर्ग पोलिसांच्या ताब्यात आला आहे. आरोपीविरुद्ध एन.डी.पी.एस. कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक २३ मार्च २०२५ रोजी रात्री ९ वाजता, नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या पथकाने नळदुर्ग ते अक्कलकोट रस्त्यालगत बी.के. फंक्शन हॉलसमोर तपासणी दरम्यान एक इसम गुंगीकारक अमली पदार्थ गांजा सेवन करताना आढळून आला. पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले आणि चौकशी केली.
आरोपीची ओळख:
१) सुलतान उर्फ टिपु लतीफ शेख (वय ३३ वर्षे, रा. ताडीवाला रोड, पुणे. सध्या रा. रहीमनगर, नळदुर्ग, ता. तुळजापूर, जि. धाराशिव)
पोलिसांनी आरोपीविरुद्ध एन.डी.पी.एस. कायदा १९८५ अंतर्गत कलम ८(सी) आणि २७ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून, अमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांनी कडक कारवाई सुरू ठेवली आहे.