नळदुर्ग: मशिदीच्या (मस्जिद) कामात हस्तक्षेप का करता, या कारणावरून ५ जणांच्या टोळक्याने एका व्यक्तीला लोखंडी रॉड आणि लाकडी काठीने जबर मारहाण केल्याची घटना नळदुर्ग (ता. तुळजापूर) येथे घडली. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल अलीम सत्तार शेख (वय ४२, रा. रहीम नगर, नळदुर्ग) असे मारहाणीत जखमी झालेल्या फिर्यादीचे नाव आहे. ही घटना रविवार, दि. १४ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६.१५ ते ६.३० च्या दरम्यान नळदुर्ग येथील हकीम कुरेशी यांच्या घराशेजारील सार्वजनिक रोडवर घडली.
फिर्यादी अब्दुल शेख आणि आरोपी यांच्यात मशिदीमध्ये हस्तक्षेप करण्याच्या कारणावरून वाद झाला होता. याच वादातून आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून शेख यांना गाठले. यावेळी त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच आरोपींनी लोखंडी रॉड, लाकडी काठी आणि हातातील लोखंडी पंचने मारून शेख यांना जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी खालील ५ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे:
१. मुज्जमील अहमद कुरेशी २. विजामौद्दीन हकीम कुरेशी ३. सईद अहमद कुरेशी ४. शफिक गुलाम समदानी बाडेवाले ५. मुख्तदीर गुलाम बाडेवाले (सर्व रा. नळदुर्ग)
जखमी अब्दुल शेख यांनी उपचारादरम्यान दिलेल्या वैद्यकीय जबाबावरून गुरुवारी (दि. १८) नळदुर्ग पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१) (स्वेच्छेने दुखापत करणे), ११५(२), १२६(२), ३५२, ३५१(२), १८९ (बेकायदेशीर जमाव), १९१(२)(३) (दंगल) आणि १९० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.






