• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, March 4, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

नळदुर्ग : गॅस टाकी भरण्याच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण; तिघांविरोधात गुन्हा दाखल

admin by admin
September 19, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल
0
SHARES
223
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

नळदुर्ग- गॅस टाकी भरून आणण्याच्या शुल्लक कारणावरून एका छत्तीस वर्षीय तरुणाला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे घडली आहे. या मारहाणीत तरुणाच्या हाताच्या मनगटाला गंभीर दुखापत झाली असून, त्याला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली.

याप्रकरणी पीडित तरुणाच्या तक्रारीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात दोन महिलांसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी भारत बालाजी बोराडे (वय ३६, रा. चिवरी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ही घटना ४ सप्टेंबर रोजी सकाळी आठच्या सुमारास घडली. फिर्यादी आपल्या मुलासोबत गॅस टाकी भरून आणत असताना आरोपी बिभीषण महादेव बोराडे, सुलभा राजेंद्र क्ज्ञाब्ळे आणि छाया बिभीषण बोराडे (सर्व रा. चिवरी) यांनी त्यांना अडवून वाद घालण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. आरोपींनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, हात पिरगाळून मनगटाजवळ गंभीर जखमी केले आणि घटनेची वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

या घटनेनंतर भारत बोराडे यांनी गुरुवारी, १८ सप्टेंबर रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११७(२), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. नळदुर्ग पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Previous Post

मुरुम : पोस्ट ऑफिसमध्ये खातेदारांना गंडा, १.३७ लाखांची फसवणूक; कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

धाराशिव जिल्ह्यात दुचाकी चोरांचा सुळसुळाट; वेगवेगळ्या ठिकाणांहून तीन मोटारसायकली लंपास

Next Post
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात दुचाकी चोरांचा सुळसुळाट; वेगवेगळ्या ठिकाणांहून तीन मोटारसायकली लंपास

ताज्या बातम्या

शासकीय योजना लाटण्यासाठी बनावट शिक्के आणि प्रमाणपत्रे

कळंब: पेट्रोल पंपाच्या भागीदारीत तब्बल साडेचार कोटींची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर: पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यानेच लांबवली ९० हजारांची रोकड; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
आमदार राणाजगजितसिंह पाटील : मंत्रिपदाचं स्वप्न आणि ‘मित्र’ची भेट !

धाराशिव झेडपी सत्तापेच: तानाजी सावंतांना डावलण्याचा डाव उलटला, भाजप आमदार राणा पाटलांचे टेन्शन वाढले!

March 3, 2026
एसटीच्या ताफ्यात लवकरच “स्मार्ट बसेस”; प्रवासी सुरक्षेला प्राधान्य – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

“प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही!” – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा सज्जड इशारा

March 3, 2026
चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

March 3, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group