नळदुर्ग: आगामी नळदुर्ग नगर परिषद निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना, आज प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. या आरक्षणामुळे अनेक इच्छुकांचे भवितव्य निश्चित झाले असून, शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. एकूण १० प्रभागांमधील २० जागांसाठी हे आरक्षण जाहीर करण्यात आले असून, यामध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यात आले आहे.
प्रशासनामार्फत जाहीर करण्यात आलेल्या यादीनुसार, विविध प्रवर्गांसाठी जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. यामुळे अनेक विद्यमान नगरसेवकांना आपले प्रभाग सोडावे लागण्याची शक्यता आहे, तर अनेक नवीन चेहऱ्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची संधी मिळाली आहे. आरक्षण जाहीर होताच सर्वच राजकीय पक्षांमध्ये संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू झाली असून, राजकीय बैठका आणि भेटीगाठींना वेग आला आहे.
प्रभागनिहाय आरक्षण खालीलप्रमाणे:
प्रभाग क्रमांक | जागा | आरक्षण प्रवर्ग |
१ | अ | नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) |
ब | सर्वसाधारण | |
२ | अ | अनुसूचित जाती |
ब | सर्वसाधारण (महिला) | |
३ | अ | नागरिकांचा मागास प्रवर्ग |
ब | सर्वसाधारण (महिला) | |
४ | अ | सर्वसाधारण (महिला) |
ब | सर्वसाधारण | |
५ | अ | सर्वसाधारण (महिला) |
ब | सर्वसाधारण | |
६ | अ | नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) |
ब | सर्वसाधारण | |
७ | अ | नागरिकांचा मागास प्रवर्ग |
ब | सर्वसाधारण (महिला) | |
८ | अ | अनुसूचित जाती (महिला) |
ब | सर्वसाधारण | |
९ | अ | नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) |
ब | सर्वसाधारण | |
१० | अ | अनुसूचित जाती (महिला) |
ब | सर्वसाधारण |
या आरक्षण सोडतीमुळे अनुसूचित जातीसाठी ३ जागा (२ महिला), नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) ५ जागा (३ महिला) आणि उर्वरित १२ जागा सर्वसाधारण (५ महिला) प्रवर्गासाठी निश्चित झाल्या आहेत. आता राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे, त्यानंतरच नळदुर्ग नगर परिषदेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाईल.