नळदुर्ग : मोटारसायकला ट्रकने धडक दिल्याने एक ठार तर दोन जखमी झाल्याची घटना उमरगा- सोलापूर रोडवरवरील नळदुर्ग येथे घडली. याप्रकरणी ट्र्क चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी नामे- अमीर रफीक पटेल, वय 30 वर्षे, सोबत त्यांची पत्नी- मयत नामे- शन्नु अमीर पटेल, वय 25 वर्षे, मुलगी उरफा रा. गणेश नगर, हैद्राबाद रोड, सोलापूर ता. जि. सोलापूर दि 17.11.2023 रोजी 18.00 वा. सु. एनएच 65 रोडवर काली मज्जीद, नळदुर्ग समोरील रोडवर नळदुर्ग शिवार येथे जात होते. दरम्यान ट्रक क्र के. 56- 4353 चा चालक आरोपी नामे- गफुर शेख यांनी त्याचे ताब्यातील ट्रक हा भरधाव वेगावत निष्काळजीपणे चालवुन अमीर पटेल यांचे मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली. या अपघातात फिर्यादीची पत्नी शन्नु पटेल या गंभीर जखमी होवून मयत झाल्या. अशा मजकुराच्या फिर्यादी अमीर पटेल यांनी दि.17.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) 427 सह मोवाका 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद
कळंब : आरोपी नामे-1)संतोष राजाभाउ झोरी, वय 35 वर्षे, रा. मोहा, ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.17.11.2023 रोजी 12.30 वा. सु.आपल्या ताब्यातील महिंद्रा वाहन क्र एमएच 25 एम 572 हा होळकर चौक कळंब येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना कळंब पोलीसांना मिळून आला. तसेच 2)धनंजय विश्वनाथ गाढवे, वय 28 वर्षे, रा. बोर्डा ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.17.11.2023 रोजी 14.40 वा. सु.आपल्या ताब्यातील ॲपे क्र एमएच 12 जीटी 2127 हा होळकर चौक कळंब येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना कळंब पोलीसांना मिळून आला.यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.द.स. कलम 283 अन्वये कळंब पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.