• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, March 3, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

नळदुर्ग शहरातील अर्धवट रस्त्याच्या कामामुळे नागरिक त्रस्त

 तातडीने काम पूर्ण न झाल्यास उपोषणाचा इशारा

admin by admin
April 22, 2025
in धाराशिव जिल्हा
Reading Time: 1 min read
नळदुर्ग शहरातील अर्धवट रस्त्याच्या कामामुळे नागरिक त्रस्त
0
SHARES
199
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

नळदुर्ग: शहरातील रणे प्लॉटिंग परिसरातील अर्धवट अवस्थेत असलेल्या रस्त्याच्या कामामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या सात वर्षांपासून रखडलेल्या या कामामुळे ये-जा करताना नागरिक, लहान मुले आणि वयोवृद्धांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, अनेकदा पडून जखमी होण्याच्या घटना घडत आहेत. या प्रकाराविरोधात परिसरातील नागरिकांनी एकत्र येत नगर परिषदेला निवेदन देऊन काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे.

नागरिकांनी दिलेल्या निवेदनानुसार, रणे प्लॉटिंगमधील ख्वाजा नगर येथील रस्त्याचे काम २०१६ पासून रखडले होते. वारंवार मागणी आणि आंदोलनानंतर २०१८ मध्ये कामाला सुरुवात झाली, मात्र इमरान कुरेशी यांच्या घरासमोरील सुमारे ४० ते ५० मीटरचे काम अर्धवटच सोडण्यात आले. त्यामुळे या भागात गटार आणि नळाचे पाणी रस्त्यावर साचून तळ्याचे स्वरूप आले आहे. यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

विशेषतः या अर्धवट कामामुळे रस्ता निसरडा होऊन अनेक जण पडत आहेत. तीन दिवसांपूर्वी सिद्रा अफिजुर कुरेशी नावाची शाळकरी मुलगी याच रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

याबाबत नगर परिषद प्रशासनाकडे वारंवार लेखी आणि तोंडी तक्रारी करूनही कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर, परिसरातील नागरिकांनी प्रशासनाला येत्या आठ दिवसांत अर्धवट राहिलेले रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे. तसेच, अर्धवट काम सोडणाऱ्या गुत्तेदारावर आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या नगर परिषद कर्मचारी/अधिकार यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

जर आठ दिवसांत रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही, तर दिनांक ०५/०५/२०२५ रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून नगर परिषद कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, आमदार आणि पोलीस निरीक्षक यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. प्रशासनाने नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन तातडीने दिलासा द्यावा, अशी आर्त विनवणी नागरिकांनी केली आहे.

Previous Post

“काका-पुतणं, भावंडं आणि राजकारणाची कुस्ती!”

Next Post

तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: २२ फरार आरोपी अन् पोलिसांची निष्क्रियता !

Next Post
“तुळजापूर ड्रग्ज – केस चालू की केस दाबण्याचा खेळ?”

तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: २२ फरार आरोपी अन् पोलिसांची निष्क्रियता !

ताज्या बातम्या

शासकीय योजना लाटण्यासाठी बनावट शिक्के आणि प्रमाणपत्रे

कळंब: पेट्रोल पंपाच्या भागीदारीत तब्बल साडेचार कोटींची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर: पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यानेच लांबवली ९० हजारांची रोकड; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
आमदार राणाजगजितसिंह पाटील : मंत्रिपदाचं स्वप्न आणि ‘मित्र’ची भेट !

धाराशिव झेडपी सत्तापेच: तानाजी सावंतांना डावलण्याचा डाव उलटला, भाजप आमदार राणा पाटलांचे टेन्शन वाढले!

March 3, 2026
एसटीच्या ताफ्यात लवकरच “स्मार्ट बसेस”; प्रवासी सुरक्षेला प्राधान्य – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

“प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही!” – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा सज्जड इशारा

March 3, 2026
चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

March 3, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group