मुंबई: पुण्यश्लोक राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त, मुंबई येथील भारतीय इतिहास प्रबोधिनी आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेडिकल असोसिएशन यांनी राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेची घोषणा केली आहे. अहिल्याबाई होळकर यांच्या कर्तृत्वाची यशोगाथा समाजापर्यंत पोहोचावी हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. ही स्पर्धा पूर्णपणे ऑनलाईन असल्यामुळे स्पर्धकांना घरबसल्या यात सहभागी होता येणार आहे. स्पर्धेचे आयोजन तीन गटांमध्ये करण्यात आले आहे.
पारितोषिकांचे स्वरूप:
प्रत्येक गटातील विजेत्यांना आकर्षक पारितोषिके दिली जाणार आहेत.
- प्रथम क्रमांक: ₹ १०,०००/- रोख रक्कम आणि पुस्तके.
- द्वितीय क्रमांक: ₹ ७,०००/- रोख रक्कम आणि पुस्तके.
- उत्तेजनार्थ: पाच स्पर्धकांना प्रत्येकी ₹ ५००/- किमतीची पुस्तके देण्यात येतील.
- सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
महत्वाच्या तारखा:
- प्रवेश आणि व्हिडिओ पाठवण्याची अंतिम तारीख: १० ऑगस्ट २०२५
- निकाल घोषणा: ३० सप्टेंबर २०२५
- बक्षीस वितरण समारंभ: २६ ऑक्टोबर २०२५
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आवश्यक असलेले नियम, अटी, स्पर्धेचे गट, विषय आणि वेळेची मर्यादा याबद्दल अधिक माहितीसाठी स्पर्धकांनी 8424867070 या व्हॉट्सॲप क्रमांकावर संदेश पाठवावा.
या स्पर्धेला डॉ. प्रभाकर कोळेकर, डॉ. बाबासाहेब दुधभाते, डॉ. निलेश शेळके, डॉ. रमिला गायकवाड, डॉ. रामकिशन दहिफळे, ॲड. अभिमान पाटील, डॉ. रमेश पिशे, डॉ. बळीराम गायकवाड, डॉ. महेश मोटे, डॉ. ताहेर पठाण, डॉ. शैलेंद्रकुमार शर्मा आणि डॉ. भरत ठाकोर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.आयोजक समितीमध्ये डॉ. वर्षा चौरे, प्राचार्य अन्वर शेख, मुख्याध्यापक प्रभाकर घाटुळे, राजू हाके ,रामभाऊ लांडे, अनिलकुमार ढोले, बिरू कोळेकर, अरविंद सुरोशे, प्राध्यापक जावेद पाशा, डॉ. प्रभू चौधरी, उमेश कोरम, उमेश चाफे, डॉ. पांडुरंग श्रीरामे यांचा समावेश आहे
इतिहासातून प्रेरणा घेऊन भविष्याचा वेध घेण्यासाठी जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.