धाराशिव – शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला धाराशिव जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या महिला प्रदेश सचिव संगीता काळे यांनी आज मुंबई येथे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. ऐन नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर हा महत्त्वाचा पक्षप्रवेश झाल्याने, धाराशिव जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढल्याचे मानले जात आहे.
या प्रवेश सोहळ्यासाठी संसदरत्न खासदार श्रीकांतजी शिंदे, धाराशीव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक, शिवसेना सचिव संजय मोरे, मराठवाडा विभागीय सचिव अशोक पटवर्धन, धाराशीव जिल्हाप्रमुख सुरज राजाभाऊ साळुंके, व्हीजेएनटी विभागाचे जिल्हाध्यक्ष कमलाकर दाणे यांच्यासह धाराशिव जिल्ह्यातील प्रमुख शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संगीता काळे यांच्या प्रवेशावर बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके म्हणाले, “संगीता काळे यांच्या प्रवेशामुळे पक्षातील महिला संघटनाला नवी ऊर्जा मिळाली आहे. त्यांच्या या प्रवेशाने जिल्ह्यात शिवसेनेची ताकद आणखी बळकट होणार आहे.”





