मुंबई: राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर दोन दिवसीय लक्षवेधी असहकार आंदोलन सुरू केले आहे. राज्यभरातील १७ संघटनांनी एकत्र येऊन हे आंदोलन पुकारले आहे, ज्यात कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्याची प्रमुख मागणी आहे.
आंदोलकांच्या मते, १४ मार्च २०२४ रोजीच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करून समायोजन प्रक्रियेसाठी एक निश्चित कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा. जर शासनाने मागण्या लेखी स्वरूपात मान्य केल्या नाहीत, तर २१ जुलै २०२५ पासून राज्यातील सर्व कंत्राटी आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी बेमुदत संपावर जातील, असा इशाराही संघटनांनी दिला आहे.
या आंदोलनात सहभागी होण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे दोन दिवसांच्या किरकोळ रजेसाठी अर्ज केला आहे. या संदर्भातील निवेदनावर किरण बारकूल, जीवन कुलकर्णी, किशोर गवळी, सतीश गिरी, जयराम शिंदे, किरण तानवाडे, संजय मुळे, अमर सपकाळ, संतोष कोरपे, अशोक चव्हाण आणि प्रशांत वाघमारे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
आंदोलनात सहभागी असलेल्या १७ संघटना:
- महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटना
- अखिल भारतीय समुदाय आरोग्य अधिकारी संघटना
- राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम कंत्राटी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी संघर्ष समिती
- राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी/अधिकारी एकता संघ
- आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियन
- महाराष्ट्र राज्य अस्थायी कुष्ठरोग तंत्रज्ञ असोसिएशन
- कंत्राटी औषध निर्माता कृती समिती
- राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी/अधिकारी समन्वय संघटना
- महाराष्ट्र राज्य सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कर्मचारी संघटना
- संघर्ष महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी, कामगार तथा मजुर संघटना
- कंत्राटी आयुष वैद्यकीय अधिकारी संघटना
- प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संघटना
- राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघ
- महाराष्ट्र राज्य IFM आरोग्य कर्मचारी संघटना
- डेंटल संघटना महाराष्ट्र राज्य
- आरबीएसके कॉन्ट्रॅक्चुअल मेडीकल ऑफिसर युनियन
- कास्ट्राईब असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम कर्मचारी कल्याण