उमरगा – काल, 12 जुलै 2024 रोजी, उमरगा तालुक्यातील जकेकुरवाडी येथे एका अत्यंत दुःखद घटनेची नोंद झाली. फिर्यादी बाळासाहेब सैन जगताप (वय 32 वर्षे, रा. जकेकुरवाडी) हे त्यांच्या मित्र नितीन बसवराज तेली (वय 32 वर्षे, रा. हन्नुर, ता. अक्कलकोट) यांच्यासोबत दि. 01 जुलै 2024 रोजी रात्री 9:15 वाजता मोटरसायकलवरून प्रवास करत होते. दरम्यान, अशोक लिलॅड टेम्पो (क्रमांक MH 25 AJ 2956) चालक अरबाज महेबुब बागवान (रा. कासारशिरसी, ता. निलंगा) यांनी हायगई आणि निष्काळजीपणे टेम्पो चालवून बाळासाहेब यांच्या मोटरसायकलला धडक दिली. या अपघातात नितीन तेली यांचा जागीच मृत्यू झाला, तर बाळासाहेब गंभीर जखमी झाले.अपघातानंतर, आरोपी अरबाज बागवान घटनास्थळावरून पसार झाला
बाळासाहेब जगताप यांनी दिनांक 12 जुलै 2024 रोजी उमरगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, अरबाज बागवान याच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 281, 125(ए), 125(बी), 106(1), 134(अ)(ब) आणि 184 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.पोलिसांनी आरोपी अरबाज बागवान याच्याविरोधात तपास सुरू केला असून त्याला लवकरच अटक करण्याचा प्रयत्न करत आहेत.
नळदुर्गजवळ कंटेनरची स्कुटीला धडक: महिलेचा मृत्यू, मुलगी गंभीर जखमी
नळदुर्ग – सोलापूर रोडवरील अणदूर स्मशानभूमी जवळ आज सकाळी कंटेनरने स्कुटीला मागून धडक दिल्याने झालेल्या या अपघातात एका 32 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला तर तिची 6 वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे.
मृत महिलेची ओळख रेखा अंकुश बेरगळ (वय 32) अशी झाली आहे. त्यांच्यासोबत त्यांची 6 वर्षीय मुलगी अनुष्का अंकुश बेरगळ स्कुटीवरून जात होती. दरम्यान, एमएच 46 बीएम 4071 क्रमांकाचा कंटेनर त्यांच्या स्कुटीला धडकला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंटेनर चालकाने हायगयी आणि निष्काळजीपणे वाहन चालवत असताना अचानक ब्रेक दाबले. यामुळे रेखा बेरगळ यांची स्कुटी कंटेनरला पाठीमागून धडकली आणि त्या गंभीर जखमी होऊन मृत्यूमुखी पडल्या. तर अनुष्का बेरगळ ही किरकोळ आणि गंभीर जखमी झाली आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यावर तात्काळ घटनास्थळी पोलीस आणि रुग्णालयाचे कर्मचारी दाखल झाले. रेखा बेरगळ यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर अनुष्का बेरगळ यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 281, 125(ए), 125(बी), 106(1) आणि 184 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.