मुरुम : मयत नामे- अरुण त्रंबक गाडेकर, वय 34 वर्षे, रा. सुदंरवाडी ता. उमरगा जि. धाराशिव हे दि. 08.01.2024 रोजी 17.30 वा. सु. सुंदरवाडी येथुन येणेगुर येथे मोटरसायकल क्र एमएच 24 क्यु. 6136 वरुन जात होते. दरम्यान महालिंगरायवाडी शिवारात नागोराव लखनगावे यांचे शेताजवळ मुरुम मोड ते मुरुम जाणारे रोडवर अशोक लिलॅन्ड टेम्पो क्र एमएच 23 एयु. 4875 चा चालक आरोपी नामे- रेहान रहीम शेख रा. बीड यांनी त्याचे ताब्यातील अशोक लिलॅन्ड टेम्पो हा हायगई व निष्काळजीपणे चालवून अरुण गाडेकर यांचे मोटरसायकलला समोरुन धडक दिली. या अपघातात अरुण गाडेकर हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-शिवाजी मधुकर घुळे, वय 35 वर्षे, रा. सुंदरवाडी ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.09.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 338, 304(अ) सह 184, मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मुरुम : मयत नामे- रामभाउ सिताराम राठोड, वय 35 वर्षे, रा. जळकोटवाडी नरखुरी तांडा, ता. तुळजापूर जि. धाराशिव हे मोटरसायकल क्र एमएच 25 एक्यु 6972 वरुन आष्टामोड ते जळकोट प्रवास करत असताना दि.16.10.2023 रोजी 20.00 वा. सु. दस्तापूर ता. लोहारा जि. धाराशिव एन एच 65 रोडवर तवेरा जीप क्र एपी 09 बीएच 3231 चा चालकाने त्याचे ताब्यातील तवेरा जीप ही हायगई व निष्काळजीपणे चालवून अचानक ब्रेक लावल्याने रामभाउ राठोड यांची मोटरसायकल ही पाठीमागून धडक बसून अपघात झाला. या अपघातात रामभाउ राठोड हे गंभीर जखमी होवून उपचार दरम्यान मयत झाले. अशा मजकुराच्या मयताची पत्नी नामे-द्रोपदी रामभाउ राठोड, वय 34 वर्षे, रा. जळकोटवाडी नरखुरी तांडा, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.08.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 338, 304(अ) सह 184, 134 अ ब मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा : फिर्यादी नामे- विजयानंद बालाजी घंटे, वय 24 वर्षे, व सोबत मयत नामे- सौरभ महादेव पाचंगे, वय 19 वर्षे, दोघे रा. नारंगवाडी, ता. उमरगा जि. धाराशिव हे दोघे मोटरसायकल क्र एमएच 25 बीबी 0915 वरुन कवठ येथुन पारंगवाडी कडे येत असताना दि.28.12.2023 रोजी 21.30 वा. सु. मातोळा बोरी पुलाजवळ, दगडु भोसले यांचे शेताजवळ उमरगा लातुर रोडवर कार क्र एमएच 24 व्ही 6897 चा चालकाने त्याचे ताब्यातील कार ही हायगई व निष्काळजीपणे चालवून विजयानंद घंटे यांचे मोटरसायकलला समोरुन धडक दिली. या अपघातात विजयानंद घंटे हे गंभीर जखमी झाले, तर सौरभ पाचंगे हे गंभीर जखमी होवून जागीच मयत झाले. तसेच नमुद कार चालक हा जखमीस व मयतास औषधउपचार कामी घेवून न जाता कार जागीच सोडून पसार झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- विजयानंद घंटे यांनी दि.08.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304(अ) सह 184, 134 अ ब मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा : मयत नामे- कलीम मकबुल शेख वय 65 वर्षे,रा. गुंजोटी, ता. उमरगा जि. धाराशिव व जखमी नामे- ज्योतीबा खंडु माळी रा.नारंगवाडी, ता. उमरगा जि. धाराशिव हे दोघे दि. 02.01.2024 रोजी 16.00 वा. सु. उमरगा शहरातुन चौरस्ता जकेकुर कडे जाणाऱ्या रोडवर सुहाना हॉटेल समोरुन पायी जात होते. दरम्यान आरोपी नामे- प्रविण प्रतापराव शिंदे, रा. तुरोरी, ता. उमरगा जि. धाराशिव यांनी त्यांचे ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 24 बीएन 3443 ही हायगई व निष्काजीपणे भरधाव वेगात चालवून कलीम शेख यांना साईडने धडक दिली. या अपघातात कलीम शेख हे गंभीर जखमी होवून जागीच मयत झाले. तसेच नमुद आरोपी प्रविण शिंदे यांनी पुढे जावून ज्योतीबा माळी यांना धडक देवून गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- जमीर कलीम शेख, वय 40 वर्षे रा. गुंजोटी, ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.08.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304(अ) सह 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.