• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, March 4, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

परंडा: ‘वाळू का काढू देत नाही’ म्हणत सरपंचास पाईप, हॉकी स्टीकने मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

admin by admin
April 10, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
0
SHARES
1k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

परंडा –  “आम्हाला वाळू का काढू देत नाहीस?” असा जाब विचारत, वाळू काढण्यास विरोध करणाऱ्या ३५ वर्षीय सरपंचाला तिघा जणांनी मिळून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी, हायड्रोलिक पाईप आणि हॉकी स्टीकने मारहाण करून जखमी केले. ही घटना परंडा तालुक्यातील चिंचपूर-लंगोटवाडी रस्त्यावर घडली. याप्रकरणी पीडित तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून आंबी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी सरपंच महेश भागवत देवकर (वय ३५ वर्षे, रा. चिंचपूर बु., ता. परंडा) यांनी आंबी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, दि. ५ एप्रिल २०२५ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ते चिंचपूर ते लंगोटवाडी रस्त्यावर असताना आरोपी माधव कल्याण शिंदे, बालाजी प्रदीप शिंदे आणि अशोक अंगद अनभुले (सर्व रा. चिंचपूर बु., ता. परंडा) यांनी त्यांना अडवले.

‘तू आम्हाला वाळू का काढू देत नाही?’ असे म्हणत आरोपींनी महेश देवकर यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना लाथाबुक्क्यांनी, हायड्रोलिक पाईप आणि हॉकी स्टीकने मारहाण करून जखमी केले. तसेच, आरोपींनी त्यांना जीवे ठार मारण्याची धमकीही दिली.

या घटनेनंतर सरपंच महेश देवकर यांनी दि. ९ एप्रिल २०२५ रोजी आंबी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी माधव शिंदे, बालाजी शिंदे आणि अशोक अनभुले यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११५(२), २८१, ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

वाळू उपशाच्या वादातून झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून, आंबी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Previous Post

कळंब: रस्त्यावर सळई टाकण्याच्या वादातून माय-लेकाला विटांनी मारहाण

Next Post

कावलदरा रोड रॉबरी: पोलिसांची मोठी कारवाई! येडशी टोलनाक्यावर सापळा रचून ४ सराईत आरोपी जेरबंद

Next Post
कावलदरा रोड रॉबरी: पोलिसांची मोठी कारवाई! येडशी टोलनाक्यावर सापळा रचून ४ सराईत आरोपी जेरबंद

कावलदरा रोड रॉबरी: पोलिसांची मोठी कारवाई! येडशी टोलनाक्यावर सापळा रचून ४ सराईत आरोपी जेरबंद

ताज्या बातम्या

शासकीय योजना लाटण्यासाठी बनावट शिक्के आणि प्रमाणपत्रे

कळंब: पेट्रोल पंपाच्या भागीदारीत तब्बल साडेचार कोटींची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर: पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यानेच लांबवली ९० हजारांची रोकड; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
आमदार राणाजगजितसिंह पाटील : मंत्रिपदाचं स्वप्न आणि ‘मित्र’ची भेट !

धाराशिव झेडपी सत्तापेच: तानाजी सावंतांना डावलण्याचा डाव उलटला, भाजप आमदार राणा पाटलांचे टेन्शन वाढले!

March 3, 2026
एसटीच्या ताफ्यात लवकरच “स्मार्ट बसेस”; प्रवासी सुरक्षेला प्राधान्य – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

“प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही!” – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा सज्जड इशारा

March 3, 2026
चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

March 3, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group