• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, October 13, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

परंड्याचं ‘एमडी’ पुराण २.०: पिक्चर अभी बाकी है… पण नेते मैदानात!

admin by admin
April 26, 2025
in विशेष बातम्या
Reading Time: 1 min read
परंड्याचं ‘एमडी’ पुराण २.०: पिक्चर अभी बाकी है… पण नेते मैदानात!
0
SHARES
699
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

मंडळी, परत एकदा स्वागत आहे परंड्याच्या ‘एमडी’ पुराणाच्या नव्या एपिसोडमध्ये! मागच्या वेळी आपण सहा आरोपींवर येऊन थांबलो होतो, आठवतंय? तर, ब्रेकिंग अपडेट! काल, २५ एप्रिलला, बार्शी पोलिसांनी पुन्हा एकदा ‘शिकार’ करत आणखी दोन ‘कलाकारांना’ गजाआड केलंय. यातले एक आहेत परंड्याचे दीपक शामराव काळे आणि दुसरे बार्शीच्या खांडवीचे आयाज मुन्ना शेख. म्हणजे आता ‘टीम एमडी’चा फायनल स्कोर झालाय ८! आणि हो, यातले ५ अजूनही अस्सल ‘परंडेकर’च आहेत! काय म्हणता राव, परंड्याने टॅलेंट निर्यात करायचं सोडून हे काय सुरू केलंय! 😉

बार्शी पोलीस (आणि पडद्यामागचे आपले ‘सिंघम’ कुलकर्णी साहेब!) मात्र फुल ‘अॅक्शन मोड’मध्ये दिसतायत. १७ एप्रिलला ३, १९ एप्रिलला ३ आणि आता २५ तारखेला २… असा धडाका लावलाय की विचारू नका! पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या नेतृत्वात तपास असा सुसाट सुटलाय की, जणू काही ‘फास्ट अँड फ्युरियस’चा पुढचा भाग बार्शीत शूट होतोय! (गुन्हा रजिस्टर नंबर ३५३/२०२५ आणि कलमं NDPS, आर्म्स ऍक्ट वगैरे… सगळं कायदेशीर चालू आहे हं!)

पण थांबा, पिक्चरमध्ये नवीन एन्ट्री झाली आहे! आता नेतेही मैदानात!

एकीकडे बार्शी पोलीस आरोपी उचलत असताना, दुसरीकडे राजकीय वातावरण तापायला लागलंय. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार राहुल मोटे साहेबांनी थेट पोलीस अधीक्षकांनाच निवेदन देऊन टाकलं! म्हणतात, “अहो साहेब, परंड्यात ड्रग्सचा नुसता सुळसुळाट झालाय, तरुण पिढी बरबाद व्हायच्या मार्गावर आहे! बार्शी पोलिसांनी कारवाई केली, चांगली गोष्ट आहे, पण हे रॅकेट मोठंय, मुळापासून उखडून काढा!” त्यांचा इशारा पण त्याच ‘हाजी मस्तान’ नावाच्या म्होरक्याकडे आहे, जो अजूनही पोलिसांच्या ‘रडार’वर असूनही ‘नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर’ आहे!

आणि दुसरीकडे, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर साहेबांनी तर बॉम्बच टाकलाय!

भाजपच्या ठाकूर साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन थेट घोषणा केली की, “परंड्यातलं रॅकेट हे तुळजापूरपेक्षाही मोठं आहे भाऊ! मी स्वतः मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना भेटून याचा सोक्षमोक्ष लावणार आहे!” त्यांनी तर आरोपींची बँक खाती गोठवायची आणि म्होरक्याला तातडीने अटक करायची मागणी केलीये. ठाकूर साहेबांनी तर परंड्याच्या तब्बल ९ जणांची नावं घेतलीत (आणि बार्शीचे ३ वेगळे!), ज्यातले जावेद मुजावर, फिरोज शेख आणि शेळके नावाचे तिघे अजून ‘फरार’ असल्याचंही सांगितलंय! (आता नक्की किती आरोपी आहेत, याचा आकडा पोलिसांकडून कन्फर्म करावा लागेल, पण यादी मोठी आहे हे नक्की!) ठाकूर साहेब म्हणतात, “कुणीही असो, कोणत्याही पक्षाचा असो, गय केली जाणार नाही!” म्हणजे आता मजा येणार!

आणि आता ऐका सगळ्यात ‘गरमागरम’ बातमी!

एकीकडे हे नेतेमंडळी आणि बार्शी पोलीस इतका धुरळा उडवत असताना, आपले धाराशिव LCB चे इन्स्पेक्टर साहेब मात्र शांत कसे? तर मंडळी, अशी पडद्यामागची जोरदार कुजबुज (आणि काही उघड आरोप!) आहेत की, या साहेबांना परंड्यातलं हे ड्रग्जचं मोठं जाळं आधीपासूनच पूर्णपणे माहीत होतं! का? अहो, कारण ते पूर्वी परंडा पोलीस स्टेशनलाच कार्यरत होते ना!

आणि खरी ‘चर्चा’ तर ही आहे की, त्यांच्या ‘अर्थपूर्ण’ आशीर्वादामुळेच म्हणे तिकडे हे सगळं ‘आलबेल’ सुरू होतं. कारण? सोप्पं आहे – दर महिन्याला न चुकता ‘मलई’ पोहोचती होत होती! मग काय, हातची घडी आणि तोंडावर बोट ठेवून सगळं शांतपणे बघायचं! आता ही ‘मलई’ वरपर्यंत अजून कुणाकुणाला वाटली जात होती, याची चर्चा तर जोरात सुरू आहे, पण उत्तर कोण देणार?

लोकांना आता हा पण प्रश्न पडलाय की, असं कोणतं विशेष ‘कर्तृत्व’ या साहेबांनी दाखवलं होतं की त्यांना थेट LCB सारखी ‘सोन्याची अंडी देणारी’ समजली जाणारी खुर्ची मिळाली? म्हणतात ना, आता त्या खुर्चीवर बसून रोज ताजी ‘अंडी’ मिळत आहेत म्हणे! पण ही सोन्याची अंडी नक्की कोणत्या कोणत्या खिशात जात आहेत, याचा शोध घेणं फार महत्त्वाचं आहे! कदाचित याचमुळे तिकडे नेते कितीही ओरडले तरी इकडे शांतता नांदतेय की काय, कोण जाणे!

पण सगळ्यात मोठा विनोद काय माहित्येय?

गुन्हा परंड्याचा (धाराशिव जिल्हा), मोठे नेते परंड्याच्या ड्रग्सबद्दल बोलतायत, चिंता व्यक्त करतायत, पण कारवाईचा सगळा ‘लाईमलाईट’ अजूनही बार्शी पोलिसांवरच (सोलापूर जिल्हा)! आपले धाराशिव पोलीस आणि ते LCB चे जुने ‘जाणकार’ इन्स्पेक्टर साहेब अजूनही ‘शांततेच्या’ मूडमध्येच दिसतायत. आता नेतेमंडळींनी इतका गजर केल्यावर तरी त्यांना जाग येणार की नाही? की अजूनही त्यांच्यासाठी तो ‘हाजी मस्तान’ बिच्चारा ‘गरीब’च आहे? ‘बगलेत कळसा आणि गावाला वळसा’ या म्हणीचा असा प्रात्यक्षिक प्रयोग क्वचितच बघायला मिळतो!

पुढे काय?

‘हाजी मस्तान’ आणि त्याचे फरार साथीदार अजून किती दिवस पोलिसांना गुंगारा देणार? ठाकूर साहेब मुख्यमंत्र्यांना भेटल्यावर काही ‘मोठा धमाका’ होणार? आणि सगळ्यात महत्त्वाचं, धाराशिव पोलीस या ‘एमडी’ पुराणात स्वतःची भूमिका कधी स्पष्ट करणार? की बार्शी पोलीसच पूर्ण पिक्चरचा ‘The End’ करणार? बघूया… तोपर्यंत, बार्शी पोलिसांना पुन्हा एकदा सॅल्यूट आणि बाकीच्यांना… काय म्हणू आता… ‘Get Well Soon’? 😉

Previous Post

उमरग्यात अवकाळी पावसाचा कहर: वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू, गाय – बैलही दगावला

Next Post

परंड्याचं ‘एमडी’ पुराण ३.०: म्होरक्याची कुंडली उलगडली! ( From वेटर To ड्रग्ज पेडलर स्टोरी )

Next Post
परंड्याचं ‘एमडी’ पुराण ३.०: म्होरक्याची कुंडली उलगडली! ( From वेटर To ड्रग्ज पेडलर स्टोरी )

परंड्याचं 'एमडी' पुराण ३.०: म्होरक्याची कुंडली उलगडली! ( From वेटर To ड्रग्ज पेडलर स्टोरी )

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये मोठी कारवाई: ‘पिंजरा’ लोकनाट्य कला केंद्राचा परवाना रद्द; नियमभंगाचा ठपका

पिंजरा बंद झाला, आता महाकालीवर वरवंटा कधी फिरणार?

October 12, 2025
उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

आंबी पोलिसांची कारवाई; अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला, चार लाखांचा मुद्देमाल जप्त

October 11, 2025
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

करजखेडा चौकातील सराफा दुकान फोडून साडेचार लाखांचा ऐवज लंपास; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

October 11, 2025
धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

धाराशिव: जिल्हा परिषदेत बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक; गुन्हा दाखल

October 11, 2025
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

उमरगा: शेतजमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील सहा जणांकडून मारहाण; जीवे मारण्याची धमकी

October 11, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group