• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, February 4, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापुरात पोलीस कन्येची आत्महत्या, प्रेमप्रकरणातून छेडछाड आणि धमकीमुळे उचलले टोकाचे पाऊल

admin by admin
June 12, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात पोलीस कन्येची आत्महत्या, प्रेमप्रकरणातून छेडछाड आणि धमकीमुळे उचलले टोकाचे पाऊल
0
SHARES
5k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर : प्रेम आणि लग्नासाठी धमकावून सोशल मीडियावर बदनामी करण्याची आणि पिस्तुलाने जीवे मारण्याची धमकी दिल्याने एका पोलीस कर्मचाऱ्याच्या १५ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तुळजापुरात घडली आहे. सारिका बिजली शिकारे (वय १५ वर्षे ५ महिने) असे मृत मुलीचे नाव असून, याप्रकरणी ओंकार कांबळे आणि नगीना शशिकांत पांडागळे या दोघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपी ओंकार कांबळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पिस्तूल खरेदी-विक्री आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे.

“मी तुळजापूरचा डॉन,” आरोपीची मुजोरी

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी ओंकार कांबळे ( वय २२ ) आणि नगीना पांडागळे हे सारिकाला वेळोवेळी बोलावून तिच्यावर ओंकारसोबत प्रेम आणि लग्न करण्यासाठी दबाव टाकत होते. नकार दिल्यास सोशल मीडियावर बदनामी करण्याची आणि पिस्तुलाने जीवे मारण्याची धमकी देत होते. या सततच्या त्रासाला आणि जाचाला कंटाळून सारिकाने ३१ मे २०२५ रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आपले जीवन संपवले.

घटनेच्या आदल्या दिवशी आरोपी ओंकारने सारिकाची छेड काढली होती. त्यावेळी सारिकाच्या आईने, ज्या स्वतः एक पोलीस कर्मचारी आहेत, त्याला फोनवरून जाब विचारला असता, “मी तुळजापूरचा डॉन आहे, माझं कुणी वाकडं करू शकत नाही,” अशी मुजोर भाषा वापरून धमकी दिली होती. यावरून आरोपीची गुन्हेगारी मानसिकता आणि मस्तीखोरी दिसून येते.

अखेर गुन्हा दाखल

मुलीच्या आत्महत्येनंतर खचलेल्या आई, बिजली मधुकर शिकारे (वय ३५) यांनी १० जून २०२५ रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी ओंकार कांबळे आणि नगीना पांडागळे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०७ (आत्महत्येस प्रवृत्त करणे), ३५१(३) (धमकी देणे) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलीला अशा प्रकारे धमकावून आत्महत्या करण्यास भाग पाडल्याने तुळजापुरात संतापाची लाट उसळली असून, आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. आरोपी ओंकार कांबळे याचा गुन्हेगारी रेकॉर्ड पाहता, या प्रकरणाचा सखोल तपास करून त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Previous Post

नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा, राज्य सरकारकडून प्रभाग रचनेचे आदेश जारी

Next Post

तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: फिर्यादी आणि बातमीदार यांच्या भूमिकांवर प्रश्नचिन्ह

Next Post
तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: माजी नगराध्यक्षा पतीला अंतरिम जामीन; पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: फिर्यादी आणि बातमीदार यांच्या भूमिकांवर प्रश्नचिन्ह

ताज्या बातम्या

वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिव: ‘तुमच्यामुळे कंपनीचे नुकसान होते’ म्हणत सुरक्षा रक्षकाला १२ जणांकडून जबर मारहाण; मेंढा शिवारातील घटना

February 2, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिव: आर्थिक व्यवहारातून तरुणाला खोऱ्याच्या दांड्याने बेदम मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

February 2, 2026
धाराशिव जिल्ह्यात रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी केवळ २१ टक्के

‘शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट नाही, खर्च मात्र तिप्पट झाला’; कैलास पाटलांची अर्थसंकल्पावर सडकून टीका

February 1, 2026
भूम – परंड्यात राणा पाटलांचे ‘पॉलिटिक्स’; युतीधर्म बासनात गुंडाळून तानाजी सावंतांचा ‘गेम’ करण्याची तयारी!

धाराशिव जिल्हा परिषद: “घराणेशाहीच्या स्वप्नावर पाणी फेरल्याशिवाय राहणार नाही”

February 1, 2026
लोहारा तालुक्यात प्रचाराचा धुरळा! खासदार ओमराजे व आमदार स्वामींच्या झंझावाती सभा

लोहारा तालुक्यात प्रचाराचा धुरळा! खासदार ओमराजे व आमदार स्वामींच्या झंझावाती सभा

February 1, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group