धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयातील नोकरी फसवणूक प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या गट शिक्षणाधिकारी मॅडमच्या दिवट्या चिरंजीवाने सोमवारी सकाळी नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावली. पण गुन्हा दाखल होण्याऐवजी तो तपास अधिकाऱ्यांसोबत चहापाणी करत असल्याचे चित्र दिसले!
“गुन्हेगार की पाहुणा?” – पोलिसांची सौजन्यता कोणासाठी?
- फसवणूक झालेल्या तरुणांना न्याय मिळावा म्हणून पोलिसांवर दबाव वाढत असताना, मुख्य आरोपी मात्र पोलीस ठाण्यात मोकळेपणाने फिरतोय!
- त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याऐवजी तोच तपास अधिकाऱ्यांसोबत चहा पिताना दिसतो, म्हणजेच प्रकरण आपसात मिटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत का?
“सामाजिक कार्यकर्त्यांनी याची गंभीर दखल घ्यावी!”
- गुन्हा दाखल होईल असे पोलिसांनी आश्वासन दिले होते, पण त्याऐवजी मुख्य आरोपीचे स्वागतच सुरू असल्यासारखी स्थिती दिसते.
- सामाजिक कार्यकर्ते, फसवणूक झालेल्या तरुणांनी आणि प्रसारमाध्यमांनी यावर आवाज उठवला नाही तर हे प्रकरण दबवले जाण्याची शक्यता आहे.
फसवणूक झालेल्या तरुणांसाठी महत्त्वाची सूचना!
फसवणूक झालेल्या तरुणांनी आपली तक्रार नळदुर्ग पोलिसात नोंदवावी तसेच धाराशिव लाइव्हकडे तिची प्रत पाठवावी.
धाराशिव लाइव्ह या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा करीत आहे.
📞 ➡ संपर्क करा: 7387994411
“गुन्हा दाखल होईल का, की चहापाण्यात प्रकरण मिटणार?”
मुख्य आरोपी पोलिसांसोबत गप्पा मारतोय, तर फसवणूक झालेल्या तरुणांना गुन्हा दाखल होतोय की नाही, याची प्रतीक्षा करावी लागतेय! हा न्याय की राजकीय प्रभाव?
या प्रकरणात पुढील अपडेटसाठी ‘धाराशिव लाइव्ह’ पाहत राहा!