धाराशिव : धाराशिवच्या ढोकी रोडवरील फॉरेस्टमध्ये 11 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 ते 6:30 च्या दरम्यान दरोडा आणि मारहाणीची घटना घडली. या प्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी रोहित उत्तमराव लाडके (वय 30, रा. गोंदळेनगर, हडपसर) हे आपल्या मित्रांसह इनोव्हा कारने (क्र. एमएच 12 सीआर 3660) लातूरकडे जात होते. त्यावेळी आरोपींनी त्यांची गाडी अडवली आणि महानंदा कासले यांच्यासोबत फिरण्यावरून शिवीगाळ करत मारहाण केली. आरोपींनी लाडके यांच्यासह त्यांच्या मित्रांना लोखंडी रॉड, कोयता आणि दगडांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच, त्यांच्याकडून 7 ग्रॅमची सोन्याची चेन, 3 ग्रॅमच्या दोन अंगठ्या, चांदीचे ब्रेसलेट, 2,500 रुपये आणि दोन मोबाईल फोन लुटून नेले.
या प्रकरणी लखन तानाजी कासले, राम तानाजी कासले (दोघे रा. बेकराईनगर, हडपसर), अतिश अशोक पवार (रा. ससाणेनगर), महादेव गुरुलींग कलशेट्टी (रा. बेकराईनगर, हडपसर), अक्षय सुनिल परदेशी (रा. म्हसोबा मंदीर, काळपडाळ, हडपसर), तनवीर शेख, साहिल कचरावत (दोघे रा. काळेपडाळ डेरेकंपनी, हडपसर) आणि एक अन्य इसम यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम 190, 191(2), 191(3), 118(2), 119(2),126(2), 352, 351(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.