धाराशिव -नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी स्पष्ट केले की, ते शिवसेना शिंदे गटात जाणार नसून, शिवसेना ठाकरे गटातच कायम राहणार आहेत. त्यांनी सांगितले की, त्यांच्या पक्षांतराच्या अफवा निराधार आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाराशिवचे सुधीर पाटील यांनी भाजपला सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. या घटनेनंतर धाराशिवचे भैय्या आणि कळंबचे आप्पा शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. धाराशिवचे भैय्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटल्याचे वृत्त पसरले होते. मात्र, मकरंद राजेनिंबाळकर यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे.
काही लोक जाणीवपूर्वक अशा प्रकारच्या अफवा पसरवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.