तुळजापूर: तुळजापूर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपी तरुणाने पीडित मुलीचा पाठलाग करून तिला सोलापुरातील एका लॉजमध्ये नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर “माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुझे व्हिडिओ व्हायरल करून बदनामी करेन”, अशी धमकी दिल्याची तक्रार पीडित मुलीने तुळजापूर पोलीस ठाण्यात दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाने २९ सप्टेंबर २०२४ ते ९ डिसेंबर २०२४ या कालावधीत पीडित मुलीचा पाठलाग केला आणि तिला सोलापुरातील लॉजमध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी पीडित मुलीने १२ डिसेंबर २०२४ रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी आरोपी तरुणावर भादंवि कलम ६४, ७५, ७८, १२६(२), ३५१(२), ३५१(३), बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा २०१२ कलम ४, ८, १२, १५ आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.