धाराशिव – तालुक्यातील कावळेवाडी येथे एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. २८ ऑक्टोबर रोजी ५० वर्षीय विष्णु विठ्ठल शिंदे यांची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बबलू रंगा शिंदे (रा. सिडफार्म गोवर्धनवाडी) यांनी विष्णु शिंदे यांना विषारी औषध पाजून हत्या केली आहे. विष्णु शिंदे यांनी आपल्या मुलीचे लग्न बबलू शिंदे यांच्यासोबत करण्यास नकार दिला होता. याच कारणावरून बबलू शिंदे यांनी हे कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे.
विष्णु शिंदे यांच्या पत्नी लक्ष्मी शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ढोकी पोलीस ठाण्यात भा.न्या.सं.कलम 103(1), 77 सह बा.लै.अ.प्र.का. कलम 8,12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी आरोपी बबलू शिंदे यांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.