धाराशिव: प्रशासकीय कारणांसाठी धाराशिव जिल्हा परिषदेच्या एका विभागातून दुसऱ्या विभागात एकूण ६० कर्मचाऱ्यांची विभाग बदली करण्यात आली आहे.
- सामान्य प्रशासन विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी-०४, विस्तार अधिकारी (सांख्यिकी)-०२, कनिष्ठ प्रशासन अधिकारी-०२, वरिष्ठ सहाय्यक-१७, कनिष्ठ सहाय्यक-२६ असे एकूण ५१ कर्मचारी सामान्य प्रशासन विभागातील इतर विभागांमध्ये बदली करण्यात आले आहेत.
- वित्त विभागातील सहाय्यक लेखाधिकारी-०७, कनिष्ठ लेखा अधिकारी-०२ वरिष्ठ सहाय्यक (लेखा)-०७, कनिष्ठ सहाय्यक (लेखा)-०३ असे एकूण ९ लेखा कर्मचारी वित्त विभागातील इतर विभागांमध्ये बदली करण्यात आले आहेत.
बदल्यांचे कारण:
- हे बदल ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक १५ मे, २०१४ (दोन) अन्वये प्रशासकीय कारणासाठी जिल्हा परिषदेच्या एका विभागातून दुसऱ्या विभागात बदल्या धोरणानुसार करण्यात आले आहेत.
- तब्बल दहा वर्षानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. घोष यांनी या बदल्या केल्या आहेत,