• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, July 1, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

राणा दादांचे साडी प्रेम: मतांच्या धाग्यात गुंतलेली राजकीय खेळी !

admin by admin
September 27, 2024
in राजकारण
Reading Time: 1 min read
राणा दादांचे साडी प्रेम: मतांच्या धाग्यात गुंतलेली राजकीय खेळी !
0
SHARES
943
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांचा आत्मविश्वास नेहमीच टोकाचा असतो, पण लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पत्नी सौ. अर्चना पाटील यांच्या तुफान पराभवानंतर काहीसा ढासळलेला दिसतोय. पराभवाचा घाव ताजाच असतानाही, राणा दादांनी आता विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. मागील निवडणुकीत अर्चनाताईंना त्यांच्या चुलत दीराने – ओमराजे निंबाळकर यांनी तीन लाखाहून अधिक मतांनी हरवलं. घरातल्या या राजकीय लढाईतच पाटील कुटुंबाचा खेळ खलास झाला.

लोकांना नवरा एका पक्षात आणि बायको दुसऱ्या पक्षात असण्याचं सिरीयल ड्रामा आवडला नाही, आणि अर्चनाताईंना दिल्लीत पाठवण्याऐवजी गल्लीतच ठेवून टाकलं. पण आता विधानसभा निवडणूक जवळ आली आहे, आणि राणा दादा आपल्या पायात चपला घालून मतदारसंघात ठाण मांडून बसले आहेत.

गावोगावी साडींचं वाटप करताना त्यांची धडपड दिसून येतेय. साड्या वाटायच्या, त्या पण अस्सल “महिला सक्षमीकरण” या नावाखाली! आज अणदूरमध्ये जवळपास 1,000 महिलांनी 300 रुपयांच्या साड्यांसाठी गर्दी केली, जणू काही ही साडी ‘लाडकी बहिण योजना’तली नवीन भेटच आहे. तुळजाभवानीच्या आशिर्वादाने, साड्यांच्या जादूने आता राणा दादांच्या मनात एकच विचार – महिलांना खूश करा आणि मतंही मिळवा.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने ‘लाडकी बहिण योजना’ सुरू करून महिलांना दरमहा दीड हजाराची ओवाळणी दिली आहे, आता राणा दादा फुकट साड्यांनी त्या आनंदात भर घालण्याचा प्रयत्न करतायत. पण, त्या लाडक्या बहिणी आता राणा दादांना मते देतील का? की अर्चनाताईप्रमाणे त्यांनाही गल्लीतच ठेवतील? हे मात्र नोव्हेंबरमध्येच कळणार. साडीचा धागा आणि राजकारणाचा गुंता, तोवर फक्त बघत राहायचं!

– बोरुबहाद्दर

Previous Post

धाराशिव: टपरीसमोरील ‘विधी’चं भांडण अन् लाथाबुक्क्यांचा ‘नैसर्गिक’ न्याय!

Next Post

गुंड साहेबांचा ‘आमदारकीचा अट्टाहास’ आणि राजकीय गोंधळ

Next Post
गुंड साहेबांचा ‘आमदारकीचा अट्टाहास’ आणि राजकीय गोंधळ

गुंड साहेबांचा 'आमदारकीचा अट्टाहास' आणि राजकीय गोंधळ

ताज्या बातम्या

धाराशिव नगरपालिकेत ‘खुर्चीचा खेळ’, अधिकारी येतात-जातात, कारभार वाऱ्यावर!

धाराशिव नगरपालिकेत ‘खुर्चीचा खेळ’, अधिकारी येतात-जातात, कारभार वाऱ्यावर!

July 1, 2025
परंडा : शेळगावमध्ये पित्याचा राक्षसी अवतार: पोटच्या नऊ वर्षीय मुलीची कुऱ्हाडीने हत्या

परंडा : शेळगावमध्ये पित्याचा राक्षसी अवतार: पोटच्या नऊ वर्षीय मुलीची कुऱ्हाडीने हत्या

June 30, 2025
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव: दिवसाढवळ्या घरफोडी, सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास

June 30, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

उमरगा: जुन्या भांडणातून शेतकऱ्याला मारहाण, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

June 30, 2025
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

शिराढोण येथे २१ वर्षीय तरुणीवर अत्याचार, धमकी देऊन वारंवार लैंगिक शोषण

June 30, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group