तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी तामलवाडी पोलिसांनी आणखी दोन आरोपींना अटक केली असून, आता या प्रकरणातील आरोपींची एकूण संख्या १९ वर पोहोचली आहे. मात्र, या कारवाईतील गंभीर विसंगती म्हणजे सात फरार आरोपींपैकी चार जणांची नावे पोलिसांनी अद्याप गोपनीयच ठेवली आहेत. या गोपनीयतेमागे नेमके काय कारण आहे, असा सवाल जनतेतून उपस्थित होत आहे.फरार आरोपीमध्ये एका पोलिसांचा मुलगा असल्याचे आज समोर आले आहे.
काल अटक करण्यात आलेल्यामध्ये पुढील आरोपींचा समावेश आहे:
- सुलतान लतीफ शेख (वय ३४) – पुणे
- जीवन नागनाथ साळुंखे (वय २९) – सोलापूर
१० आरोपींना न्यायालयीन कोठडी
आतापर्यंत १० आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत:
- विश्वनाथ तर्फ पिंटू आप्पाराव मुळे (वय ४०) – रा. सराटी, ता. तुळजापूर
- सयाजी शाहूराज चव्हाण (वय २५) – तुळजापूर
- ऋतुराज सोमनाथ गाहे (वय २४) – तुळजापूर
- सुमित सुरेशराव शिंदे (वय ३५) – तुळजापूर
- संकेत अनिल शिंदे (वय २३) – तुळजापूर
- संगिता वैभव गोळे (वय ३२) – मुंबई
- संतोष अशोक खोत (वय ४९) – मुंबई
- अमित उर्फ चिम्या अशोकराव अरगडे (वय ३३) – तुळजापूर
- युवराज देवीदास दळवी (वय ३८) – तुळजापूर
- संदीप संजय राठोड (वय २२) – नळदुर्ग,ता. तुळजापूर
फरार आरोपींची यादी
या प्रकरणात अद्याप फरार असलेल्या आरोपींची यादी पुढीलप्रमाणे आहे:
- स्वराज उर्फ पिनू सचिन तेलंग (तुळजापूर) – माजी नगराध्यक्षांचा हस्तक
- वैभव अरविंद गोळे (मुंबई) – आरोपी संगिता गोळे हीचा पती
- राहुल कदम – परमेश्वर (तुळजापूर) – पोलिसाचा मुलगा
मात्र, यातील चार फरार आरोपींची नावे पोलिसांनी गोपनीय ठेवली आहेत:
- आरोपी क्रमांक ७ – नाव गोपनीय
- आरोपी क्रमांक १० – नाव गोपनीय
- आरोपी क्रमांक ११ – नाव गोपनीय
- आरोपी क्रमांक १२ – नाव गोपनीय
पोलिसांची गुप्तता संशयास्पद!
ड्रग्ज प्रकरणात एवढी मोठी कारवाई झाल्यानंतरही चार आरोपींची नावे पोलिसांनी का लपवली आहेत? या गुप्ततेमागे नेमके कोणाचे हात आहेत? आरोपींची ओळख निष्पन्न झाल्यानंतरही त्यांना अटक का करण्यात आलेली नाही? माजी नगराध्यक्षांचा हस्तक आणि पोलिस अधिकाऱ्याचा मुलगा फरार असताना, पोलिसांच्या वर्तवणुकीवर संशयाची सावली पडत आहे.
जनतेच्या मनात या प्रकरणाबद्दल प्रचंड रोष आहे. पोलिसांनी पारदर्शकतेने तपास करावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. या प्रकरणात कोणत्याही प्रकारची राजकीय अथवा पोलिसीय आडपडदा स्वीकारला जाणार नाही, याची हमी दिली जावी, असे मत स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाचा गुंता दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत चालला आहे. आजपर्यंत १९ आरोपींवर गुन्हा नोंदवला गेला आहे. त्यापैकी १० जण कारागृहात आहेत, दोन जण अटकेत तर सहा जण फरार आहेत. फरार आरोपींपैकी दोन जणांची नावे जाहीर झाली आहेत, परंतु उर्वरित चार नावे अद्याप गुप्त आहेत. या फरार आरोपींवर ‘लूक आऊट नोटीस’ का काढण्यात आलेली नाही? त्यांची संपत्ती जप्त का करण्यात आलेली नाही? या सर्व प्रश्नांमुळे पोलिस यंत्रणेची कार्यक्षमतेवर संशय निर्माण झाला आहे.