तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावर धाराशिव लाइव्हने उचललेल्या आवाजानंतर अखेर पोलिसांनी गुप्त ठेवलेली चार आरोपींची नावे जाहीर केली आहेत. या निर्णयामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर उठलेल्या प्रश्नांना उत्तर मिळाले असले तरी, प्रकरणाची व्याप्ती अधिक वाढली आहे.
चार गुप्त आरोपींची नावे जाहीर:
धाराशिव लाइव्हने लावलेल्या वादळानंतर अखेर पोलिसांनी पुढील आरोपींची नावे उघडकीस आणली:
- ७ नंबरचा आरोपी: इंद्रजित उर्फ मिटू रणजितसिंह ठाकूर (नळदुर्ग)
- १० नंबरचा आरोपी: चंद्रकांत उर्फ बापू कणे (माजी नगराध्यक्ष, तुळजापूर)
- ११ नंबरचा आरोपी: प्रसाद उर्फ गोटन कदम – परमेश्वर (तुळजापूर)
- १२ नंबरचा आरोपी: उदय शेटे
गुप्त आरोपींची नावे समोर आल्यानंतर पोलिसांवरील राजकीय हस्तक्षेपाचे आरोप अधिक बळावले आहेत. माजी नगराध्यक्ष चंद्रकांत कणे यांचे या प्रकरणात नाव येणे हा मोठा धक्का मानला जात आहे.
ड्रग्ज प्रकरणाची व्याप्ती वाढली, सहा नवीन आरोपींची भर:
धाराशिव लाइव्हच्या दणक्यानंतर पोलिसांनी तपासाचा वेग वाढवत आणखी सहा आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे एकूण आरोपींची संख्या आता २५ झाली आहे.
नवीन आरोपींची यादी:
- विनोद उर्फ पिटू गंगणे (माजी नगराध्यक्ष पती)
- गजानन प्रदीप हंगरगेकर
- शरद रामकृष्ण जमदाडे
- आबासाहेब गणराज पवार
- अलोक शिंदे
- अभिजित गव्हाड
माजी नगराध्यक्ष आणि पती आरोपीच्या यादीत!
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आता एक माजी नगराध्यक्ष आणि माजी नगराध्यक्ष पती आरोपींच्या यादीत आले आहेत. राजकीय क्षेत्रातील या धक्कादायक घडामोडीमुळे तुळजापूरमध्ये मोठा खळबळ माजला आहे.
पोलिसांच्या तपासावर पुन्हा संशयाचे वादळ
धाराशिव लाइव्हने या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्यामुळेच गुप्त आरोपींची नावे जाहीर झाली, असे स्थानिकांचे मत आहे. मात्र, अजूनही काही आरोपी फरार आहेत. पोलिसांच्या तपासावर संशय कायम असून, राजकीय हस्तक्षेपामुळे सत्य बाहेर येण्यास अडथळा येत आहे का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
धाराशिव लाइव्ह या प्रकरणातील पुढील घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहे. सत्य आणि पारदर्शक तपासासाठी नागरिकांच्या मागण्या दिवसेंदिवस वाढत आहेत.
———————————-
अटक झालेल्या आरोपींची नावे:
सध्या अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत:
-
सुलतान लतीफ शेख (वय ३४) – पुणे
-
जीवन नागनाथ साळुंखे (वय २९) – सोलापूर
-
राहुल कदम – परमेश्वर (तुळजापूर) – पोलिसाचा मुलगा
न्यायालयीन कोठडीत असलेले आरोपी:
-
विश्वनाथ तर्फ पिंटू आप्पाराव मुळे (वय ४०) – सराटी, ता. तुळजापूर
-
सयाजी शाहूराज चव्हाण (वय २५) – तुळजापूर
-
ऋतुराज सोमनाथ गाहे (वय २४) – तुळजापूर
-
सुमित सुरेशराव शिंदे (वय ३५) – तुळजापूर
-
संकेत अनिल शिंदे (वय २३) – तुळजापूर
-
संगिता वैभव गोळे (वय ३२) – मुंबई
-
संतोष अशोक खोत (वय ४९) – मुंबई
-
अमित उर्फ चिम्या अशोकराव अरगडे (वय ३३) – तुळजापूर
-
युवराज देवीदास दळवी (वय ३८) – तुळजापूर
-
संदीप संजय राठोड (वय २२) – नळदुर्ग, ता. तुळजापूर
फरार आरोपींविषयी साशंकता:
फरार आरोपींपैकी दोन आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत:
-
स्वराज उर्फ पिनू सचिन तेलंग (तुळजापूर) – माजी नगराध्यक्षांचा हस्तक
-
वैभव अरविंद गोळे (मुंबई) – आरोपी संगिता गोळे हिचा पती
मात्र, चार फरार आरोपींची नावे गुप्त ठेवण्याचा निर्णय पोलिसांनी का घेतला आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
तामलवाडी पोलिसांवर संशय – एसआयटी तपासाची मागणी
तामलवाडी पोलिसांच्या कार्यवाहीवरही प्रश्न उपस्थित झाले असून, या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) सोपवावा, अशी मागणी होत आहे.