तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून, तामलवाडी पोलिसांच्या कारवाईवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. आतापर्यंत या प्रकरणात एकूण १९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी ३ जणांना अटक करण्यात आली असून, १० आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. मात्र, गंभीर बाब म्हणजे अद्याप ६ आरोपी फरार असून, त्यापैकी फक्त दोन जणांची नावे उघड झाली आहेत. उर्वरित चार आरोपींची नावे पोलिसांनी गुप्त ठेवली आहेत, ज्यामुळे जनतेच्या मनात संशयाचे वारे घोंगावत आहेत.
राजकीय हस्तक्षेपाचा सुगावा!
या प्रकरणातील फरार आरोपींच्या नावांची गुप्तता पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित करते. चर्चा अशी आहे की, फरार आरोपी हे राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्या आदेशावरून ड्रग्ज रॅकेट चालत होते. त्यामुळे पोलिसांवर राजकीय दबाव येत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विशेष म्हणजे, फरार आरोपी स्वराज उर्फ पिनू सचिन तेलंग हा माजी नगराध्यक्षांचा हस्तक असल्याचे समोर आले आहे. एवढे असूनही त्याला अटक का केली जात नाही, हा प्रश्न उपस्थित होत आहे. कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिसांच्या भूमिकेबाबत नागरिकांमध्ये संताप आणि अविश्वासाचे वातावरण आहे.
अटक झालेल्या आरोपींची नावे:
सध्या अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत:
- सुलतान लतीफ शेख (वय ३४) – पुणे
- जीवन नागनाथ साळुंखे (वय २९) – सोलापूर
- राहुल कदम – परमेश्वर (तुळजापूर) – पोलिसाचा मुलगा
न्यायालयीन कोठडीत असलेले आरोपी:
- विश्वनाथ तर्फ पिंटू आप्पाराव मुळे (वय ४०) – सराटी, ता. तुळजापूर
- सयाजी शाहूराज चव्हाण (वय २५) – तुळजापूर
- ऋतुराज सोमनाथ गाहे (वय २४) – तुळजापूर
- सुमित सुरेशराव शिंदे (वय ३५) – तुळजापूर
- संकेत अनिल शिंदे (वय २३) – तुळजापूर
- संगिता वैभव गोळे (वय ३२) – मुंबई
- संतोष अशोक खोत (वय ४९) – मुंबई
- अमित उर्फ चिम्या अशोकराव अरगडे (वय ३३) – तुळजापूर
- युवराज देवीदास दळवी (वय ३८) – तुळजापूर
- संदीप संजय राठोड (वय २२) – नळदुर्ग, ता. तुळजापूर
फरार आरोपींविषयी साशंकता:
फरार आरोपींपैकी दोन आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत:
- स्वराज उर्फ पिनू सचिन तेलंग (तुळजापूर) – माजी नगराध्यक्षांचा हस्तक
- वैभव अरविंद गोळे (मुंबई) – आरोपी संगिता गोळे हिचा पती
मात्र, चार फरार आरोपींची नावे गुप्त ठेवण्याचा निर्णय पोलिसांनी का घेतला आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
तामलवाडी पोलिसांवर संशय – एसआयटी तपासाची मागणी
या संपूर्ण प्रकरणाचा तपास तामलवाडी पोलीस करीत असून पोलिसांच्या संशयास्पद कारवाईवर प्रश्न उपस्थित झाले असून, या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) सोपवावा, अशी मागणी होत आहे.
या प्रकरणात पोलिसांनी गुप्तता बाळगून राजकीय हस्तक्षेपाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न तर नाही ना, हा प्रश्न नागरिकांच्या मनात उभा राहिला आहे. सत्य काय आहे, हे उघड करण्यासाठी पोलिसांनी पारदर्शकता बाळगणे गरजेचे आहे!