तुळजापूर शहरातील एमडी ड्रग्ज रॅकेटने संपूर्ण समाजव्यवस्थेला हादरा दिला आहे. केवळ काही व्यक्तींच्या हावरेपणामुळे, ‘स्मॉल टाउन’मध्येही नशेचा विळखा वाढत चालला आहे. मात्र, खरी शोकांतिका म्हणजे या काळ्या धंद्यात ओढली गेलेली तरुण पिढी!
गेल्या काही वर्षांत अनेक तरुण या जाळ्यात अडकले, काहींना पकडले गेले, पण त्यांच्या भविष्याचा विचार कोणी करणार?
‘आलाय बकरं, कापा’ – पण मग या पिढीचं काय?
आज एकेक आरोपी पकडले जात आहेत, त्यांची नावे उघड होत आहेत. पण प्रश्न असा आहे की,
- हे तरुण या धंद्यात कसे ओढले गेले?
- त्यांच्या मागे कोणी होते?
- त्यांना याच्या व्यसनात लोटणारे, वापरणारे ‘बडे मासे’ अजूनही मोकाट आहेत!
सरकार, पोलीस आणि समाज या सगळ्या तरुणांना फक्त आरोपी म्हणून पाहणार का?
विध्वंस नको, दिशा द्या!
हीच तरुण पिढी उद्या आपले भवितव्य घडवू शकते, समाजासाठी योगदान देऊ शकते. पण सध्या ते एका चुकीच्या चक्रव्यूहात अडकले आहेत.
✔ यांना बाहेर काढण्यासाठी काय उपाययोजना आहेत?
✔ नशेच्या आहारी गेलेल्या तरुणांना नव्याने जीवन जगण्याची संधी द्यायची की त्यांच्यावर फक्त शिक्के मारायचे?
✔ पोलीस, राजकीय व्यवस्था आणि सामाजिक संघटनांनी याकडे ‘सुधारणा’ म्हणून पाहावे लागेल.
पत्रकार, समाजसेवक आणि नागरिकांची जबाबदारी!
या प्रकरणात मीडिया, सामाजिक कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक आणि व्यापारी यांना पुढाकार घ्यावा लागेल.
- या तरुणांसाठी पुनर्वसन योजना आवश्यक आहे.
- तुळजापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील पत्रकारांनी या प्रकरणाची खोलीने दखल घ्यावी.
- तपास हा फक्त ‘प्याद्यांपुरता’ न करता, ‘खऱ्या सूत्रधारां’पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न व्हायला हवा.
‘वजीराला वाचवण्यासाठी प्यादे उडवले जात आहेत!’
सध्या फक्त प्याद्यांना पकडून मोठी प्रकरणे दडपण्याचा खेळ सुरू आहे.
- राजकीय छत्रछायेखाली वाढलेले हे गोरखधंदे कधी बंद होणार?
- बड्या मास्यांना पकडण्याची हिंमत पोलीस दाखवणार का?
यासाठीच धाराशिव जिल्ह्यात पत्रकार, समाजसेवक, व्यापारी आणि पालकांनी चिंतन बैठक घेणे आवश्यक आहे.
कारण ही तरुण पिढी ‘टिकवायची’ आहे, संपवायची नाही!
🚩 जगदंब… जगदंब… खेळ सुरू आहे, प्यादे उडवले जात आहेत…!
👉 वजीराला वाचवण्यासाठी #जमुरे तालीबजा! 😂