• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, April 3, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापुरात ‘खाकी’चा माज: ज्या अधिकाऱ्याला मुदतवाढ मिळवून दिली, तोच भाजपच्या अंगलट!

 पुण्याच्या भाविकांना बेदम मारहाण; जाब विचारणाऱ्या भाजप नेत्यालाही धक्के मारून काढले

admin by admin
April 3, 2026
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
तुळजापुरात ‘खाकी’चा माज: ज्या अधिकाऱ्याला मुदतवाढ मिळवून दिली, तोच भाजपच्या अंगलट!
0
SHARES
456
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर: महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दरबारात चैत्र पौर्णिमेच्या दिवशीच पोलिसांच्या ‘खाकी’ वर्दीचा जो संतापजनक आणि अमानुष चेहरा समोर आला, त्यात आता एक मोठा राजकीय भूकंप झाला आहे. पार्किंगच्या वादातून डीवायएसपी निलेश देशमुख यांनी ज्या भाविकांना रस्त्यावर झोडपून काढले, ते सर्व भाविक पुण्याचे असून ते भाजपचे जिल्हा परिषद सदस्य (काक्रंबा गट) दयानंद शिंदे यांचे नातेवाईक असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, ज्या डीवायएसपीला भाजप आमदारांनीच मुदतवाढ मिळवून दिली, तोच अधिकारी आता सत्तेच्याच उरावर बसल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.

भाजपच्या लोकप्रतिनिधीलाच केबिनमधून धक्के मारून काढले!

आपल्या पुण्याहून आलेल्या नातेवाईकांना आणि महिलांना पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची माहिती मिळताच भाजपचे जि.प. सदस्य दयानंद शिंदे हे संतप्त अवस्थेत तुळजापूर पोलीस ठाण्यात धडकले. त्यांनी या पोलीस गुंडगिरीचा डीवायएसपी निलेश देशमुख यांना जाब विचारला. मात्र, वर्दीचा माज डोक्यात गेलेल्या डीवायएसपी निलेश देशमुख  यांनी एका लोकप्रतिनिधीचा कोणताही सन्मान न राखता दयानंद शिंदे यांना चक्क धक्काबुक्की करत केबिनच्या बाहेर हाकलून दिले.

पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आणि मनधरणीचा व्हिडिओ व्हायरल

स्वतःच्याच पक्षाची राज्यात आणि केंद्रात सत्ता असताना पोलिसांकडून झालेल्या या घोर अपमानामुळे दयानंद शिंदे यांचा संताप अनावर झाला. त्यांनी तत्काळ पोलीस स्टेशनसमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले. एक सत्ताधारी पक्षाचा नेताच पोलीस स्टेशनच्या दारात बसल्याने प्रकरण अंगलट येत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. यानंतर नमते घेत पोलीस निरीक्षक मांजरे आणि भाजपचे तालुकाध्यक्ष आनंद कंदले हे दयानंद शिंदे यांची हात जोडून विनवणी करत असल्याचा आणि त्यांची मनधरणी करत असल्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

आमदारांचीच कृपा, पण अधिकारी भाजपलाच डोईजड!

या संपूर्ण प्रकरणातील सर्वात धक्कादायक आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी बाब म्हणजे डीवायएसपी निलेश देशमुख यांची तुळजापुरातील ‘पोस्टिंग’. सूत्रांच्या माहितीनुसार, याच निलेश देशमुख यांना भाजपचे स्थानिक आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनीच विशेष वजन वापरून एक वर्षाची मुदतवाढ मिळवून दिली होती. मात्र, आता हेच देशमुख भाजपच्या पदाधिकाऱ्यांसाठी भस्मासुर ठरत असून ते भाजप नेत्यांनाच डोईजड झाले आहेत.

ज्या आमदारांनी अधिकाऱ्याला अभय दिले, त्याच अधिकाऱ्याने आमदारांच्या पक्षाच्या जि.प. सदस्याला धक्के मारून बाहेर काढल्याने भाजपची मोठी नाचक्की झाली आहे. सामान्य भाविकांना लाठ्या-काठ्यांनी मारहाण करणाऱ्या आणि सत्ताधारी नेत्यांनाही न जुमानणाऱ्या या मुजोर डीवायएसपीवर आता राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री कारवाई करणार का? की आमदारांच्या कृपेने हा अधिकारी पुन्हा मोकाट सुटणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

Previous Post

तुळजापुरात खाकीचा नंगानाच! राजकीय वरदहस्ताने माजलेल्या डीवायएसपी नीलेश देशमुखांना पाठीशी कोण घालतंय?

ताज्या बातम्या

तुळजापुरात ‘खाकी’चा माज: ज्या अधिकाऱ्याला मुदतवाढ मिळवून दिली, तोच भाजपच्या अंगलट!

तुळजापुरात ‘खाकी’चा माज: ज्या अधिकाऱ्याला मुदतवाढ मिळवून दिली, तोच भाजपच्या अंगलट!

April 3, 2026
तुळजापुरात खाकी वर्दीचा माज! देवीच्या दर्शनाला आलेल्या भाविकांना पोलिसांची अमानुष मारहाण; महिलांनाही धक्काबुक्की

तुळजापुरात खाकीचा नंगानाच! राजकीय वरदहस्ताने माजलेल्या डीवायएसपी नीलेश देशमुखांना पाठीशी कोण घालतंय?

April 2, 2026
तुळजापुरात खाकी वर्दीचा माज! देवीच्या दर्शनाला आलेल्या भाविकांना पोलिसांची अमानुष मारहाण; महिलांनाही धक्काबुक्की

तुळजापुरात भाविकांना अमानुष मारहाण; डीवायएसपी निलेश देशमुख यांच्या तात्काळ निलंबनाची आमदार कैलास पाटील यांची मागणी

April 2, 2026
महामार्गावर चालत्या वाहनांतून चोरी करणारी टोळी २४ तासांत गजाआड; धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

महामार्गावर चालत्या वाहनांतून चोरी करणारी टोळी २४ तासांत गजाआड; धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

April 2, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिव: बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत ६५ वर्षीय वृद्धेचे ४५ हजारांचे दागिने लांबवले; २० वर्षीय तरुणीवर गुन्हा दाखल

April 2, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group