• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, March 31, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापुरात बनावट आधार कार्डद्वारे बँक खाते रिकामे करण्याचा डाव उधळला; सोलापुरातील दोघांवर गुन्हा दाखल

admin by admin
March 31, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापूर लाच प्रकरण: लाचखोर आरदवाड आणि प्रभारी मांजरे यांचे ‘आनंदनगर’ कनेक्शन?
0
SHARES
523
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर  : दुसऱ्या बँक खातेदाराच्या नावाने चक्क बनावट आधार कार्ड तयार करून, डुप्लिकेट पासबुकच्या आधारे बँक खाते रिकामे करण्याचा धक्कादायक प्रकार तुळजापूर येथे उघडकीस आला आहे. शहरातील नळदुर्ग रोडवरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) शाखेत हा प्रकार घडला असून, सतर्कतेमुळे हा डाव फसला आहे. याप्रकरणी बँकेची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली सोलापूर जिल्ह्यातील दोघांवर तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हणमंत दगडू घोडगे (वय ७०) आणि मनीषा संदीप गायकवाड (वय २५, दोघेही रा. कामटी, ता. ग्रामीण सोलापूर, जि. सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी बाबुराव उळेकर (रा. तुळजापूर) यांचे नळदुर्ग रोडवरील एसबीआय बँकेत खाते (खाते क्र. ६२०४११३४६८३) आहे. आरोपी हणमंत घोडगे आणि मनीषा गायकवाड यांनी संगनमत करून शिवाजी उळेकर यांच्या नावाचे बनावट आधार कार्ड तयार केले. सोमवारी (ता. ३०) दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास हे दोघेही एसबीआय बँकेच्या शाखेत आले. त्यांनी या बनावट आधार कार्डच्या आधारे बँकेत केवायसी (KYC) प्रक्रिया पूर्ण करून डुप्लिकेट पासबुक मिळवण्याचा प्रयत्न केला. पासबुक हाती आल्यानंतर उळेकर यांच्या खात्यातील पैसे काढून बँकेची आणि खातेदाराची फसवणूक करण्याचा त्यांचा मुख्य उद्देश होता.

मात्र, बँकेतील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास हा संशयास्पद प्रकार आल्यानंतर आरोपींचा हा डाव उधळला गेला. याप्रकरणी बँकेचे कर्मचारी ओंकार धोंडीराम कांबळे (वय २७, मूळ रा. चंदूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर, सध्या रा. मेहता हॉस्पिटलजवळ, तुळजापूर) यांनी तत्काळ तुळजापूर पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली.

या प्रथम खबरीवरून तुळजापूर पोलिसांनी सोमवारी (ता. ३०) रात्री उशिरा आरोपी हणमंत घोडगे आणि मनीषा गायकवाड यांच्यावर भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ३१८(४), ६२, ३(५) अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत असून, यामागे आणखी मोठी टोळी सक्रिय आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.

Previous Post

जळकोट येथे शेत रस्ते कामात मोठा भ्रष्टाचार; कागदावरच रस्ते दाखवून लाखो रुपये हडपल्याचा आरोप

Next Post

वाघोलीत ग्रामपंचायत अधिकाऱ्याला धक्काबुक्की; कार्यालयाला ठोकले कुलूप

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

वाघोलीत ग्रामपंचायत अधिकाऱ्याला धक्काबुक्की; कार्यालयाला ठोकले कुलूप

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

कळंब-येरमाळा रोडवरील हॉटेल फोडले; लॅपटॉप, धान्यासह एक लाखाचा मुद्देमाल लंपास

March 31, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

शेतरस्त्याच्या वादातून टाकळी (बें) येथे राडा; आजोबा, वडील आणि नातवाला बेदम मारहाण

March 31, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

सुनेला भेटायला येत असल्याचे सांगितल्याच्या रागातून वाशीत तरुणावर तलवारीने प्राणघातक हल्ला

March 31, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

तुळजापूर तालुक्यात संतापजनक प्रकार: खाद्यात विष कालवल्याने तीन दुभत्या गायींचा मृत्यू

March 31, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

वाघोलीत ग्रामपंचायत अधिकाऱ्याला धक्काबुक्की; कार्यालयाला ठोकले कुलूप

March 31, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group