तुळजापूर – आगामी तुळजापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर आज अत्यंत महत्त्वाची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. या सोडतीमुळे शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, इच्छुक उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. जाहीर झालेल्या आरक्षणामुळे अनेक दिग्गजांना संधी मिळाली आहे, तर काहींना सुरक्षित मतदार संघाचा शोध घ्यावा लागणार आहे.
नगरपरिषदेच्या ११ प्रभागांसाठी ही आरक्षण सोडत काढण्यात आली असून, यामध्ये अनुसूचित जाती (अनु.जाती), नागरिकांचा मागास प्रवर्ग (ना.मा.प्र.) आणि महिलांसाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या सोडतीमुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरू पाहणाऱ्या अनेक इच्छुकांचे भवितव्य निश्चित झाले आहे.
प्रभागनिहाय आरक्षण खालीलप्रमाणे:
- प्रभाग क्र. १ (तुळजापूर खुर्द):
- अ) सर्वसाधारण महिला
- ब) सर्वसाधारण
- प्रभाग क्र. २ (हाडको, विश्वानगर, आयोध्यानगर):
- अ) अनुसूचित जाती
- ब) सर्वसाधारण महिला
- प्रभाग क्र. ३ (जिजामाता नगर):
- अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
- ब) सर्वसाधारण
- प्रभाग क्र. ४ (मंकावती, आर्य चौक, साळुंके गल्ली):
- अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग
- ब) सर्वसाधारण महिला
- प्रभाग क्र. ५ (खडकाळ गल्ली, अण्णाभाऊ साठे नगर):
- अ) अनुसूचित जाती (महिला)
- ब) सर्वसाधारण
- प्रभाग क्र. ६ (आराधवाडी, भिमनगर):
- अ) अनुसूचित जाती
- ब) सर्वसाधारण महिला
- प्रभाग क्र. ७ (जवाहर गल्ली, कमान वेस, पंढरपूर गल्ली):
- अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
- ब) सर्वसाधारण
- प्रभाग क्र. ८ (वेताळ नगर, कुंभार गल्ली, चांभार गल्ली):
- अ) अनुसूचित जाती (महिला)
- ब) सर्वसाधारण
- प्रभाग क्र. ९ (घाटशिळ, दिपक चौक, वडार गल्ली):
- अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग
- ब) सर्वसाधारण महिला
- प्रभाग क्र. १० (नळदुर्ग रोड, पूर्व मंगळवार पेठ):
- अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग
- ब) सर्वसाधारण महिला
- प्रभाग क्र. ११:
- अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
- ब) सर्वसाधारण महिला
- क) सर्वसाधारण
या आरक्षण सोडतीने नगरपरिषद निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे. आता सर्वच राजकीय पक्ष आपापल्या उमेदवारांची चाचपणी आणि मोर्चेबांधणीला लागणार आहेत. या सोडतीमुळे प्रभागांची फेररचना झाल्याने काही विद्यमान नगरसेवकांना इतर प्रभागातून नशीब आजमावे लागण्याची शक्यता आहे, तर अनेक नवीन आणि तरुण चेहऱ्यांना राजकारणात प्रवेश करण्याची संधी मिळणार आहे. एकूणच, या आरक्षणामुळे तुळजापूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत आहेत.