तामलवाडी :आरोपी नामे-1)अजय रवी जाधव, 2)मिथुन सुखदेव जाधव, 3) लिंबाजी सुखदेव जाधव, 4)रवी सुखदेव जाधव, 5) हरीश टिकाराम जाधव, 6) धोंडीबा बंडु जाधव, 7) अक्षय रवी जाधव, 8) मोहन रोहीदास पवार, 9) सुमीत नितीन जाधव, 10) गोरख टिकाराम जाधव, 11) शिवाजी टिकाराम जाधव, 12) राज राठोड सर्व रा. शिवाजी नगर खडक तांडा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.25.03.2024 रोजी 15.00 वा. सु. खडकी शिवारात फिर्यादी नामे- शशिकांत भिमा राठोड, वय 40 वर्षे, रा. खडकी तांडा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना व फिर्यादीचा पुतण्या यांना मागील भांडणाचे कारणावरुन नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-शशिकांत राठोड यांनी दि.25.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो. ठाणे येथे 143, 147, 148, 324, 323, 504, 506, भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तामलवाडी :आरोपी नामे-1)सुभाष भिम राठोड, 2) अमित सुभाष राठोड, 3) अजित उर्फ राहुल सुभाष राठोड, 4) शशिकांत भिमा राठोड, 5) रवि पदमाकर चव्हाण, 6) विशाल शशिकांत राठोड सर्व रा. खडकी तांडा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. दि.25.03.2024 रोजी 15.00 वा. सु. खडकी तांडा येथील सेवालाल मंदीराचे बाजूला रोडवर फिर्यादी नामे- लिंबाजी सुखदेव जाधव, वय 40 वर्षे, रा. खडकी तांडा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना मागील भांडणाचे कारणावरुन नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, मारहाण केली. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-लिंबाजी जाधव यांनी दि.25.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो. ठाणे येथे 143, 147, 504, 506, भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तेरमध्ये हाणामारी
ढोकी :आरोपी नामे-1)बुबासाहेब भागवत जाधव, 2) भाउसाहेब उर्फ भाउराव भागवत जाधव, 3) संजय भाउराव जाधव, 4) किशोर भाउराव जाधव, 5) अमर बुबासाहेब जाधव , 6) रेश्मा प्रशांत थोडसरे सर्व रा. तेर ता. जि. धाराशिव दि.24.03.2024 रोजी 20.00 वा. सु. आराधना कलेक्शन कापउ दुकानासमोर फिर्यादी नामे- प्रशांत सुरेश थोडसरे, वय 32 वर्षे, रा. तेर ता. जि. धाराशिव यांना कपड्याचे दुकान उघडण्याचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लाकडी फळी व उसाने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-प्रशांत थोडसरे यांनी दि.25.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे 143, 147, 324, 323, 504, 506, भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.