• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, January 16, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापूरच्या तहसीलदारांकडे १५ लाखांची खंडणी मागणाऱ्या मंडळ अधिकाऱ्यासह वकिलावर गुन्हा दाखल

महसूल विभागात खळबळ

admin by admin
December 10, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
तुळजापूरच्या तहसीलदारांकडे १५ लाखांची खंडणी मागणाऱ्या मंडळ अधिकाऱ्यासह वकिलावर गुन्हा दाखल
0
SHARES
4.5k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर: स्वतःच्या वरिष्ठांनाच ब्लॅकमेल करून पैशांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार तुळजापूरमध्ये उघडकीस आला आहे. तुळजापूरचे तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्याकडे तक्रार मागे घेण्यासाठी १५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी त्यांचेच सहकारी मंडळ अधिकारी दिनेश बहिरमल आणि वकील बालाजी बोडके यांच्याविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तहसीलदार अरविंद शंकरराव बोळंगे (वय ४३) यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तहसीलदार बोळंगे हे तुळजापूर येथे कार्यरत असून, त्यांच्या अंतर्गत आरळी बु. येथे मंडळ अधिकारी म्हणून दिनेश बहिरमल हे प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत.

दिनेश बहिरमल यांनी एसबीआय बँकेचे क्रेडिट कार्ड घेतले होते, ज्याची सुमारे ४ लाख रुपये थकबाकी होती. बँकेच्या वसुलीसाठी येणाऱ्या फोन कॉल्ससाठी बहिरमल यांनी ‘कार्यालय प्रमुख’ म्हणून तहसीलदार बोळंगे यांचा मोबाईल नंबर दिला होता. विधानसभा निवडणुकीचे कामकाज सुरू असताना बँकेच्या वसुली विभागाकडून तहसीलदारांना वारंवार फोन येऊ लागले. याबाबत तहसीलदारांनी बहिरमल यांना फोन करून जाब विचारला असता, बहिरमल यांनी उलट त्यांच्या विरोधात आनंदनगर (धाराशिव) पोलीस ठाण्यात शिवीगाळ केल्याची तक्रार दाखल केली.

आनंदनगर पोलीस ठाण्यात दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी दिनेश बहिरमल आणि त्यांचे वकील बालाजी बोडके (रा. ढोकी) यांनी तहसीलदार बोळंगे यांच्याकडे पैशांची मागणी सुरू केली.

  • सुरुवातीला प्रकरण मिटवण्यासाठी १५ लाख रुपयांची मागणी करण्यात आली.

  • त्यानंतर तडजोड म्हणून १० लाख रुपये आणि माफीनाम्याची मागणी केली.

  • शेवटी माफीनामा नाही दिला तरी चालेल, पण २ लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी व्हॉट्सअॅप कॉलद्वारे करण्यात आली.

घरी येऊन बँक खाते क्रमांक दिला

दिनांक ६ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १:३० च्या सुमारास आरोपी दिनेश बहिरमल आणि वकील बालाजी बोडके हे तहसीलदार बोळंगे यांच्या तुळजापूर येथील घरी गेले. तिथे त्यांनी पैसे पाठवण्यासाठी शहाजी अभिमान कांबळे (रा. ढोकी) यांच्या बँक खात्याचा तपशील व्हॉट्सअॅपवर पाठवला आणि पैसे दिल्यास पुन्हा त्रास होणार नाही, असे सांगितले.

या सततच्या मानसिक त्रासाला आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून मंडळ अधिकारी दिनेश बहिरमल आणि ॲड. बालाजी बोडके यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०८(३) (खंडणी) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हनुमंत कांबळे करीत आहेत.

नेमके काय आहे प्रकरण?

अंक १: तहसीलदारांवर शिवीगाळीचा गुन्हा – या प्रकरणाची सुरुवात १८ नोव्हेंबर रोजी झाली. आरळी बु. येथील मंडळ अधिकारी दिनेश वैजनाथ बहिरमल यांनी २०२० मध्ये क्रेडिट कार्डवर कर्ज घेतले होते, त्याचे हप्ते थकल्याने बँकेच्या वसुली प्रतिनिधीने ‘कार्यालय प्रमुख’ म्हणून तहसीलदार अरविंद बोळंगे यांना वारंवार फोन करून त्रास दिला. या त्रासाला कंटाळून तहसीलदार बोळंगे यांनी बहिरमल यांना फोनवरून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली, असा आरोप करत बहिरमल यांनी धाराशिवच्या आनंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीवरून मंगळवारी (दि. ९) आनंदनगर पोलिसांत तहसीलदारांवर अदखलपात्र गुन्हा (NC) दाखल करण्यात आला असून, या वादाच्या पार्श्वभूमीवर मंडळ अधिकारी बहिरमल यांची तडकाफडकी जिल्हाधिकारी कार्यालयात बदली करण्यात आली आहे.

अंक २: तहसीलदारांचा ‘प्रतिडाव’ – खंडणीचा गुन्हा दाखल आनंदनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेली ही तक्रार मागे घेण्यासाठी आता आपल्यालाच ब्लॅकमेल केले जात असल्याचा आरोप तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी केला आहे.

महसूल विभागात खळबळ

एका मंडळ अधिकाऱ्याने चक्क आपल्याच तहसीलदारांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून खंडणी मागितल्याने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

Previous Post

मृत्यूचे सापळे बनलेली ‘कलाकेंद्रे’ आणि प्रशासनाची गुन्हेगारी चुप्पी!

Next Post

“मी जर अचानक गेलो तर…” व्हॉट्सॲपला ‘स्टेटस’, गळ्यात फास; नर्तकीच्या प्रेमाचा असा झाला ‘द इन्ड’!

Next Post
मृत्यूचे सापळे बनलेली ‘कलाकेंद्रे’ आणि प्रशासनाची गुन्हेगारी चुप्पी!

"मी जर अचानक गेलो तर..." व्हॉट्सॲपला 'स्टेटस', गळ्यात फास; नर्तकीच्या प्रेमाचा असा झाला 'द इन्ड'!

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये भाजपची नवी टीम: तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी, संघटनात्मक बांधणीवर भर

धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी भाजप सज्ज; तिकिटासाठी इच्छुकांची मांदियाळी, तब्बल ७१२ अर्ज दाखल

January 16, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

परंडा शहरात निवडणुकीच्या वादातून राडा; तरुणासह पुतण्यावर लोखंडी रॉडने हल्ला, चौघांवर गुन्हा दाखल

January 16, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

वडगाव (ज) येथे भररस्त्यात तलवारीसह फिरणाऱ्या तरुणावर कारवाई

January 16, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीचे सत्र सुरूच; चार ठिकाणी घरफोडी व चोऱ्या, ३ लाखांहून अधिकचा मुद्देमाल लंपास

January 16, 2026
धाराशिव: व्याजाच्या पैशांच्या वादातून तरुणांनी लुटले सावकाराचे घर

धाराशिव: व्याजाच्या पैशांच्या वादातून तरुणांनी लुटले सावकाराचे घर

January 16, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group