तुळजापूर – तालुक्यातील सरडेवाडी येथे एका विवाहितेने पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रुपाली जिवन पारधे (वय ३५) यांनी २८ ऑगस्ट रोजी रात्री आपल्या घरी डिझेल ओतून पेटवून घेत आत्महत्या केली.
रुपाली यांचे पती जिवन नागनाथ पारधे हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यासोबत क्षुल्लक कारणांवरून भांडण करून त्रास देत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या त्रासाला कंटाळून रुपाली यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.
या प्रकरणी रुपाली यांचे वडील बबन तुकाराम कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिवन पारधे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुळजापूर पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.