भूम – शहरातील वर्दळीच्या जिजाऊ चौकात सार्वजनिक रस्त्यावर धोकादायकरित्या वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दोघा वाहनचालकांवर भूम पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी स्वतः सरकारतर्फे फिर्याद देऊन ही कारवाई केली.
ही घटना सोमवारी, दि. २१ जुलै २०२५ रोजी सकाळी साडेअकरा ते सव्वा बाराच्या सुमारास घडली. भूम पोलीस जिजाऊ चौक परिसरात गस्त घालत असताना, त्यांना सार्वजनिक रस्त्यावर दोन वाहने रहदारीस धोका निर्माण होईल अशा पद्धतीने उभी केलेली आढळली.
यामध्ये राहुल राजाराम पवार (वय २२, रा. काटेगाव, ता. बार्शी, जि. सोलापूर) याच्या ताब्यातील पिकअप (क्र. एमएच १२ एमव्ही २६९२) आणि अक्षय बापू इजगज (वय २५, रा. इंदिरानगर, भूम) याच्या ताब्यातील अशोक लिलँड दोस्त (क्र. एमएच २५ एजे ४४०९) यांचा समावेश होता.
याप्रकरणी पोलिसांनी सरकारतर्फे फिर्याद देऊन दोन्ही चालकांविरोधात भूम पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे नोंदवले आहेत. त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम २८५ सह मोटार वाहन कायद्याच्या कलम १२२/१७७ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.