धाराशिव: जिल्ह्यात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच असून, लोहारा आणि भूम शहरातून दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये अज्ञात चोरट्यांनी दोन मोटारसायकल पळवून नेल्या आहेत. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांत भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली घटना: लोहारा (भर चौकातून दुचाकी चोरी)
लोहारा शहरातील गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून एक दुचाकी चोरीला गेली आहे. किरण विलास कदम (वय २९, रा. कानेगाव, ता. लोहारा) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
किरण कदम यांनी त्यांची ३५ हजार रुपये किमतीची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस (क्र. एमएच २५ ए.पी. २३७५) ही मोटारसायकल २६ डिसेंबर रोजी दुपारी १ ते १.३० च्या सुमारास लोहारा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात लावली होती. या दरम्यान अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली. याप्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी घटना: भूम (घरासमोरून गाडी गायब)
दुसरी घटना भूम शहरात घडली. दिनेश सिताराम माळी (वय २६, रा. कसबा माळी गल्ली, भूम) यांची दुचाकी त्यांच्या घरासमोरून चोरीला गेली आहे.
दिनेश माळी यांनी आपली १५ हजार रुपये किमतीची होंडा शाईन (क्र. एमएच २५ एपी १३३५) ही दुचाकी २९ डिसेंबर रोजी घरासमोर लावली होती. रात्री २.३० वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने ही गाडी चोरून नेली. याप्रकरणी दिनेश माळी यांच्या फिर्यादीवरून भूम पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.






