धाराशिव: उमरगा तालुक्यातील केसरजवळगा येथील गांधी विद्या मंदिर येथे २५ हून अधिक शालेय विद्यार्थ्यांना उलट्याचा त्रास झाल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार आज सकाळी घडला. सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना सकाळी रक्तवाढीच्या गोळ्या दिल्यानंतर हा त्रास जाणवू लागल्याचे समजते.
सध्या त्रास झालेल्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी मुरूम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. या प्रकारामुळे पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून, आरोग्य विभागाने तातडीने तपास सुरू केला आहे. विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी आरोग्य अधिकारी प्रयत्नशील आहेत.
गोळ्यांमुळे असा त्रास होण्यामागील नेमके कारण शोधण्यासाठी सखोल तपास सुरू असून, अधिकृत माहिती लवकरच जाहीर होईल, असे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
याबाबत माहिती मिळाल्यानंतर माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मुरूम रुग्णालयास भेट देऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्याची आस्थेवाईकपणे विचारपूस केली
केसरजवळगा येथील महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थाना आयर्न फॉलिक ऍसिड नावाची गोळी दिल्याने विषबाधा झाली आहे, अशी प्राथमिक माहिती आहे.
Video