उमरगा : उमरगा तालुक्यातील ८० ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाचे आरक्षण आज जाहीर करण्यात आले आहे, ज्यामुळे अनेक गावांमध्ये राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी हे आरक्षण लागू असणार आहे. यामधे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण गटासाठी जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. विशेषतः महिलांसाठी ५० टक्के जागा आरक्षित ठेवण्यात आल्याने अनेक ठिकाणी महिलांना गावचे नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे.
आज जाहीर झालेल्या आरक्षणानुसार, एकूण ८० ग्रामपंचायतींपैकी अनुसूचित जातीसाठी १३ जागा , अनुसूचित जमातीसाठी २ जागा , नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी २२ जागा आणि खुल्या प्रवर्गासाठी ४३ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.
महिलांसाठी आरक्षण
एकूण आरक्षित जागांपैकी महिलांसाठी ४० जागा ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये अनुसूचित जाती महिलांसाठी ७ जागा , अनुसूचित जमाती महिलेसाठी १ जागा , नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांसाठी ११ जागा आणि सर्वसाधारण महिलांसाठी २१ जागा आरक्षित आहेत.
प्रवर्गनिहाय आरक्षित ग्रामपंचायती खालीलप्रमाणे:
- अनुसूचित जाती (एकूण १३): आष्टा (ज), बेळंब, गुरुवाडी/चंडकाळ, बाबळसूर, त्रिकोळी, दाबका, कदमापूर/दुधनाळ, चिंचोली (ज), कंटेकूर, जकेकूर, पेठसांगवी, येळी, चिंचोली (भु).
- अनुसूचित जाती (महिला): आष्टा (ज), गुरवाडी/चंडकाळ, जकेकूर, बाबळसूर, येळी, पेठसांगवी, चिचोली (भू).
- अनुसूचित जमाती (एकूण २): जवळगाबेट, कोळसूर (गुं).
- अनुसूचित जमाती (महिला): कोळसूर (गुं).
- नागरिकांचा मागास प्रवर्ग (एकूण २२): आनंदनगर, कोरेगांव, एकोंडी (ज), मुरळी, भुसणी/भूसणीवाडी, सावळसूर, कोथळी, तलमोड, मळगीवाडी, कलदेव निबाळा, समुद्राळ, सांगवी (भि), वागदरी, कदेर, कसगी, धाकटीवाडी, औराद, तुगांव, येणेगूर, एकूरगा, सुपतगाव, डिग्गी.
- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला): कलदेव निंबाळा, सांगवी (भि), कदेर, कसगी, समुद्राळ, धाकटीवाडी, औराद, तुगांव, एकरगा, मळगीवाडी, एकोंडी (ज).
- खुला प्रवर्ग (एकूण ४३): कोराळ, नागराळ (गु), भगतवाडी, नाईचाकूर, कराळी, गुजोंटी, चिंचकोटा, जकेकूरवाडी, बेडगा, मातोळा, हंद्राळ, नारंगवाडी, केसरजवळगा, आलूर, माडज, मळगी, वरनाळवाडी, सुंदरवाडी, महालिंगरायवाडी, दावलमलीकवाडी, अंबरनगर, तुरोरी, हिप्परगाराव, थोरलीवाडी, रामपूर, गणेशनगर, कोळसूर (क), बलसूर, दगड धानोरा, जगदाळवाडी, कवठा, कुन्हाळी, बोरी, काळानिंबाळा, दाळींब, मुळज, नाईकनगर (मु), गुगळगांव, पळसगांव, व्हंताळ, नाईकनगर (सू), कडदोरा, कोरेगांववाडी.
- खुला प्रवर्ग (महिला): काळानिंबाळा, नारंगवाडी, नाईचाकूर, गुगळगांव, जकेकूरवाडी, कोरेगांववाडी, हिप्परगाराव, व्हताळ, मातोळा, पळसगांव, दाळींब, कडदोरा, कराळी, हंद्राळ, दावलमलीकवाडी, अंबरनगर, जगदाळवाडी, थोरलीवाडी, नाईकनगर (सु), नाईकनगर (मु), भगतवाडी.
या आरक्षणामुळे अनेक मातब्बर नेत्यांना निवडणुकीपासून दूर राहावे लागणार आहे, तर अनेक नवीन चेहऱ्यांना आणि विशेषतः महिलांना राजकारणात सक्रिय होण्याची संधी प्राप्त झाली आहे. या घोषणेनंतर गावागावात राजकीय हालचालींना वेग आला असून, इच्छुक उमेदवार मोर्चेबांधणीला लागले आहेत.