उमरगा :आरोपी नामे- 1)उमाकांत शेषेराव भोसले,2)अक्षय उमाकांत भोसले, 3)संजय बाबुराव भोसले, 4) नागेश अशोक भोसले, 5) सविता उमाकांत भोसले, सर्व रा. वागदरी, ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.21.12.2023 रोजी 18.00 वा .सु. गोपाळ पांडुरंग व्हंताळे रा. वागदरी यांचे घरासमोर अंगणात फिर्यादी नामे-उज्वला उर्फ फातिमा अब्दुल रब्बानी, वय 30 वर्षे रा. खडकी ता. दौंड जि. पुणे ह.मु. वागदरी ता. उमरगा जि. धाराशिव, यांना नमुद आरोपींनी शेतीच्या वादाचे कारणावरुन शिवीगाळ करुन कुह्राडीचे तुंब्याने मारुन जखमी केले. तसेच फिर्यादीचे पती व भाउ हे भांडण सोडवण्यास आले असता नमुद आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करुन काठीने, कुह्राडीचे तुंबाने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- उज्वला उर्फ फातिमा अब्दुल रब्बानी यांनी दि.22.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर :आरोपी नामे-1) दिपक कोंडीबा उंबरे, 2) मिनाक्षी दिपक उंबरे, 3) निकीता रोहण उंबरे, 4) रोहण दिपक उंबरे सर्व रा. शिराढोण ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.21.12.2023 रोजी 08.30 वा. सु. शिराढोण येथे फिर्यादी नामे- संतोष बजरंग सोनवणे, वय 47 वर्षे, रा. शिराढोण ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींने मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादीची पत्नी लक्ष्मी व मुलगा संकेत हे भांडण सोडवण्यास आले असता नमुद आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करुन काठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारु अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- अमोल दराडे यांनी दि.21.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.