ढोकी : आरोपी नामे-अर्जुन भाउ घुटूकडे, गोपाल आर्जुन घ्ज्ञुटूकडे, मारुती आर्जुन घुटूकडे, सुभाष जनार्धन घुटूकडे, मुकींद सुभाष घुटूकडे, विकास जनार्धन घुटूकडे, पुजा विकास घुटूकडे सर्व रा. वाणेवाडी ता. जि. धाराशिव यांनी दि. 03.06.2024 रोजी 21.00 वा. सु. वाणेवाडी शेत शिवारातील शेत गट नं 54, 57 मध्ये फिर्यादी नामे- अभिमान बापुराव घुटूकडे, वय 50 वर्षे, रा. वाणेवाडी ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी बांध फोडण्याच्या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अभिमान घुटूकडे यांनी दि.21.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
पारगावात पावसाचे पाणी अंगणात येण्याचे कारणावरुन लाथाबुक्यांनी मारहाण
वाशी : आरोपी नामे-जिवन चव्हाण, मोहन चव्हाण, दोघे रा. पारगाव ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि.07.06.2024 रोजी 17.00 वा. सु. पारगाव येथे फिर्यादी नामे- कृष्णा सिताराम चव्हाण, वय 28 वर्षे, रा. पारगाव ता. वाशी जि. धाराशिव यांना व त्यांचे भाउ यांना नमुद आरोपींनी पावसाचे पाणी अंगणात येण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादीची आई साखरबाई चव्हाण या भाडंण सोडवण्यास आल्या असता नमुद आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन ढकलून दिल्याने त्या खाली पडून त्यांचे डोक्याचे हाड फॅक्चर होवून गंभीर जखमी झाल्या. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- कृष्णा चव्हाण यांनी दि.21.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम 325, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.