• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, August 20, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

वाशी तालुक्यातील शेतकऱ्यांचा पवनचक्की कंपन्यांवर फसवणुकीचा आरोप, २५ जूनपासून आमरण उपोषणाचा इशारा

admin by admin
June 19, 2025
in शेती - शेतकरी
Reading Time: 1 min read
वाशी तालुक्यातील शेतकऱ्यांचा पवनचक्की कंपन्यांवर फसवणुकीचा आरोप, २५ जूनपासून आमरण उपोषणाचा इशारा
0
SHARES
1k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: वाशी तालुक्यातील तांदुळवाडी येथील शेतकऱ्यांनी सेरेंटीका आणि रिनिवल पॉवर या कंपन्यांवर आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर आरोप केला आहे, पवनचक्की आणि उच्चदाब वीजवाहिनीच्या कामासाठी ठरलेला मोबदला न दिल्याने, या शेतकऱ्यांनी २५ जून २०२५ पासून वाशी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे. 

तांदुळवाडी शिवारात सेरेंटीका आणि रिनिवल पॉवर कंपन्यांनी पवनचक्की उभारणी आणि २२० केव्ही क्षमतेच्या वीजवाहिन्या टाकण्याचे काम केले आहे. पीडित शेतकऱ्यांनी वाशी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ही कामे करताना कंपन्यांनी जमिनीचा योग्य मोबदला दिलेला नाही. २२० केव्ही टॉवरसाठी प्रति टॉवर १७ लाख रुपये आणि तारांखालील जागेसाठी प्रति मीटर २२,००० रुपये मोबदला देण्याचे ठरले होते, मात्र ही रक्कम अद्याप मिळालेली नाही.

शेतकऱ्यांचा आरोप आहे की, कंपन्यांनी बळजबरीने आणि तुटपुंजी रक्कम देऊन कामे करून घेतली आहेत. गावातील काही दलाल आणि गुंड प्रवृत्तीचे लोक शेतकऱ्यांना धमकावून जमिनीच्या कागदपत्रांवर सह्या घेत आहेत, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय, कंपन्यांनी परिसरातील फळझाडे आणि इतर झाडांची विनापरवानगी मोठ्या प्रमाणात कत्तल केली आहे. काही वीजवाहिन्या इराचीवाडी तलावाच्या पाण्यातूनही गेल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.

या प्रकरणी  उच्चस्तरीय चौकशी करून ठरल्याप्रमाणे प्रति टॉवर १७ लाख रुपये आणि तारांखालील जमिनीसाठी प्रति मीटर २२,००० रुपये प्रमाणे मोबदला त्वरित देण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास, रमेश अंकुश गाढवे, मधुकांत शिवाजी चौधरी यांच्यासह अनेक शेतकरी २५ जूनपासून उपोषणाला बसणार आहेत.

या निवेदनाच्या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आणि स्थानिक खासदार व आमदारांसह विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांना पाठवण्यात आल्या आहेत. 

Previous Post

परंड्यात गोमांस वाहतुकीचा डाव उधळला; कारसह ९ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघे ताब्यात

Next Post

 टिपेश्वरचा ‘पाहुणा’ आता धाराशिवचा ‘घरजावई’!

Next Post
धाराशिव जिल्ह्यात वाघाची दहशत! येडशीत मुक्त संचार, दोन गाई जखमी

 टिपेश्वरचा 'पाहुणा' आता धाराशिवचा 'घरजावई'!

ताज्या बातम्या

तुळजाभवानी म्हणजेच ‘भारत माता’? मंदिर प्रशासनाच्या पत्रामुळे नव्या वादाची ठिणगी

तुळजापुरात साकारणार छत्रपती शिवरायांना आशीर्वाद देणारे भव्य शिल्प; मॉडेल सादरीकरणास १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

August 19, 2025
वाखरवाडीच्या समाज मंदिरातच जुगाराचा अड्डा; ढोकी पोलिसांच्या छाप्यात नऊ जण ताब्यात

धाराशिवमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, १० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

August 19, 2025
फेसबुक पिंट्या – भाग ८: ‘उधार’ची पुण्याई आणि मातेचा ‘खो’प!

फेसबुक पिंट्या – भाग ८: ‘उधार’ची पुण्याई आणि मातेचा ‘खो’प!

August 19, 2025
श्री तुळजाभवानी मंदिर जीर्णोद्धार: विकास आराखड्याबद्दल संभ्रम, पुजारी मंडळाची पारदर्शकतेची मागणी

श्री तुळजाभवानी मंदिर जीर्णोद्धार: विकास आराखड्याबद्दल संभ्रम, पुजारी मंडळाची पारदर्शकतेची मागणी

August 19, 2025
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात गुन्हेगारीचा कळस; सोनगिरीत साडेतीन लाखांची घरफोडी, तर कळंबमध्ये शेतकऱ्यांच्या पानबुड्या लंपास

August 19, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group