येरमाळा: येरमाळा पोलिसांनी पानगाव येथील एका तरुणाकडून बेकायदेशीर तलवार जप्त केली आहे. बालाजी देविदास वाघमारे (वय 25) असे या तरुणाचे नाव असून त्याच्याविरुद्ध शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघमारे याने जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करून अंदाजे 2,000 रुपये किमतीची तलवार बेकायदेशीरपणे बाळगली होती. 30 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 13.30 वाजता पानगाव शिवारातील शेत गट क्रमांक 138 मध्ये पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
वाघमारे याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 223, शस्त्र कायदा कलम 4, 25 आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 अन्वये येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.