येरमाळा : कळंब तालुक्यातील वडगाव (ज) येथे सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या जीवास धोका निर्माण होईल, अशा पद्धतीने बेकायदेशीररीत्या तलवार बाळगणाऱ्या एका ३० वर्षीय तरुणावर येरमाळा पोलिसांनी कारवाई केली आहे. ही घटना १५ जानेवारी २०२६ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास वडगाव येथील खंडोबा मंदिर परिसरात घडली.
आकाश दत्तु पवार (वय ३०, रा. वडगाव ज., ता. कळंब) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ जानेवारी रोजी दुपारी वडगाव (ज) येथील खंडोबा मंदिराजवळ एक व्यक्ती हातामध्ये उघडी तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता होती. येरमाळा पोलिसांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडील १ हजार रुपये किमतीची तलवार जप्त केली.
याप्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लक्ष्मण भोजगुडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, आरोपी आकाश पवार याच्याविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम कलम ४, २५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास येरमाळा पोलीस करत आहेत.






