तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आरोपींची संख्या २५ वर पोहोचली असून, त्यापैकी ३ आरोपी अटकेत, १० जेलमध्ये आणि तब्बल १२ आरोपी फरार आहेत. विशेष म्हणजे या फरार आरोपींपैकी काही जणांचे राजकीय नेत्यांशी जुळलेले नाते समोर आले आहे.
भाजपशी संबंधित आरोपींची नावे:
- विनोद उर्फ पिटू गंगणे – माजी नगराध्यक्ष पती
- चंद्रकांत उर्फ बापू कणे – माजी नगराध्यक्ष, तुळजापूर
- शरद रामकृष्ण जमदाडे – माजी सभापती
- विश्वनाथ तर्फ पिंटू आप्पाराव मुळे (वय ४०) – सराटी, ता. तुळजापूर
हे सर्व आरोपी भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसाच्या जाहिरातीत दिसून आले आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पेपरमध्ये जाहिराती देण्यात आल्या होत्या. काही जण स्वतःच्या वाढदिवसानिमित्त आमदार राणा पाटील यांचा फोटो प्रसिद्ध करत होते.
शिवसेना (ठाकरे गट) संबंधित आरोपी:
- राहुल कदम – परमेश्वर आणि सुमित शिंदे
- याचे काही फोटो ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत प्रसिद्ध आहेत.
गुन्हेगाराला पक्ष नसतो, पण सत्याची भूमिका असावी
गुन्हेगार कोणत्याही पक्षाचा असो, गुन्हा हा गुन्हाच राहतो. नेत्यांसोबत फोटो असणे म्हणजे नेत्यांचा आशिर्वाद असल्याचा पुरावा होत नाही. राजकीय संबंध असले तरी प्रत्यक्ष आशिर्वाद होता का, हे तपासून पाहणे गरजेचे आहे.
धाराशिव लाइव्हची भूमिका:
काही पत्रकारांनी पॅकेज घेऊन फायद्यासाठी बातम्या प्रसिद्ध केल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर, धाराशिव लाइव्ह कधीच पेड पत्रकारिता करत नाही. सत्याचे समर्थन करणारे आणि नाहक बदनामी न करणारे हे धोरण धाराशिव लाइव्हने नेहमीच पाळले आहे. आम्ही सत्याच्या बाजूने आहोत आणि कुणालाही नाहक बदनाम करणार नाही.
सत्यावर विश्वास ठेवा – धाराशिव लाइव्ह
धाराशिव लाइव्ह नेहमीच जनतेसमोर सत्य मांडते. कुठलाही राजकीय दबाव न घेता, सत्य समोर आणण्याची आमची बांधिलकी कायम राहील.