• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, September 22, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापूर लाच प्रकरण: लाचखोर आरदवाड आणि प्रभारी मांजरे यांचे ‘आनंदनगर’ कनेक्शन?

क्रीम पोस्टिंग'मागचे रहस्य काय?

admin by admin
March 5, 2026
in धाराशिव जिल्हा
Reading Time: 1 min read
तुळजापूर लाच प्रकरण: लाचखोर आरदवाड आणि प्रभारी मांजरे यांचे ‘आनंदनगर’ कनेक्शन?
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: तुळजापूर पोलीस ठाण्याच्या आवारातच ५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) श्रीनिवास आरदवाड याच्या कारवाईनंतर आता एका नव्या आणि खळबळजनक वादाला तोंड फुटले आहे. या संपूर्ण लाच प्रकरणात तुळजापूरचे प्रभारी पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांची भूमिका काय आहे, याची सखोल चौकशी होण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. या दोघांचे जुने ‘साटेलोटे’ असल्याची जोरदार चर्चा सध्या पोलीस वर्तुळात रंगली आहे.

आनंदनगर पोलीस ठाण्यातील जुने कनेक्शन:

एकाच पोलीस ठाण्यात लाचखोरीचा एवढा मोठा प्रकार उघडकीस आल्याने संशयाची सुई थेट प्रभारी अधिकाऱ्यांकडे वळली आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे, लाचखोर एएसआय श्रीनिवास आरदवाड आणि प्रभारी पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे हे दोघेही यापूर्वी धाराशिव शहरातील ‘आनंदनगर पोलीस स्टेशन’मध्ये एकत्र कार्यरत होते. तेथूनच या दोघांचे घट्ट ‘साटेलोटे’ असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कामतकरांना हटवून आरदवाडांना ‘क्रीम पोस्टिंग’:

मांजरे यांचे आरदवाड यांच्यावर ‘विशेष प्रेम’ आणि मेहेरनजर असल्याचे नुकत्याच घडलेल्या एका घटनेवरून स्पष्ट होते. अवघ्या काही दिवसांपूर्वीच पोलीस ठाण्यातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि ‘क्रीम पोस्टिंग’ मानल्या जाणाऱ्या जागेवरून कामतकर यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या जागी मांजरे यांनी आपला मर्जीतील अधिकारी म्हणून एएसआय श्रीनिवास आरदवाड यांची वर्णी लावली होती. या ‘क्रीम पोस्टिंग’मागे नेमके काय साटेलोटे होते, हे या लाच प्रकरणावरून आता उघड होताना दिसत आहे.

मांजरे यांच्या भूमिकेची चौकशी होणार का?

आरदवाड याने गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि कलमवाढ न करण्यासाठी मागितलेली लाचेची रक्कम खरोखरच फक्त त्याच्याच खिशात जाणार होती, की यात वरपर्यंत ‘हिस्सा’ ठरलेला होता? आनंदनगरपासूनची मैत्री आणि तुळजापूरमधील ‘क्रीम पोस्टिंग’ची बक्षीसी पाहता, एसीबीने आता या प्रकरणात प्रभारी पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांचा नेमका ‘रोल’ काय होता, याचाही तपास करण्याची अत्यंत गरज आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, एखाद्या पोलीस ठाण्यात लाचेचे प्रकरण घडल्यास प्रभारी अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल. आता एवढे भक्कम कनेक्शन समोर आल्यावर पोलीस अधीक्षक रितू खोखर या प्रभारी निरीक्षक मांजरे यांच्यावर काय कारवाई करणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

Previous Post

 तुळजाभवानीच्या पवित्र नगरीत ‘खाकी’ला भ्रष्टाचाराची वाळवी; गुन्हेगारीच्या विळख्यात कायदा-सुव्यवस्था!

Next Post

धाराशिव लाईव्ह इम्पॅक्ट: अखेर तुळजापूरच्या ‘त्या’ दोन लाडक्या पोलिसांना घरचा रस्ता; एसपींच्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्यांवर कारवाई!

Next Post
तुळजापूर लाच प्रकरण: लाचखोर आरदवाड आणि प्रभारी मांजरे यांचे ‘आनंदनगर’ कनेक्शन?

धाराशिव लाईव्ह इम्पॅक्ट: अखेर तुळजापूरच्या 'त्या' दोन लाडक्या पोलिसांना घरचा रस्ता; एसपींच्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्यांवर कारवाई!

ताज्या बातम्या

शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!

September 21, 2026
शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

September 21, 2026
आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

September 20, 2026
‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!

‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!

September 19, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उंडेगाव : दुचाकी अडवून “माझ्या आईला का बोलावतोस?” विचारत चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी

September 19, 2026

Recent Posts

  • उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!
  • शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर
  • आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!
  • ‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!
  • उंडेगाव : दुचाकी अडवून “माझ्या आईला का बोलावतोस?” विचारत चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!