येरमाळा : तेरखेडा शिवारात शेतीच्या वादातून हल्ला करून मारहाण, संपत्तीची तोडफोड, आणि खंडणी मागणी केल्याच्या आरोपावरून येरमाळा पोलीस ठाण्यात 13 जणांविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. 24 मार्च 2025 रोजी रात्री 10.30 वाजल्यापासून दि. 25 मार्च 2025 रोजी पहाटे 1.30 वाजेपर्यंत तेरखेडा शिवारातील गट क्रमांक 1225 आणि 1226 मध्ये ही घटना घडली.
फिर्यादी माणिकलाल उर्फ माणिकचंद चंदुलाल बोरणा (वय 76 वर्षे, रा. तेरखेडा, ता. वाशी, जि. धाराशिव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शेतीच्या वादातून गैरकायद्याची मंडळी जमवून आरोपींनी बळकावण्याच्या उद्देशाने शेतात हल्ला केला.
घटनास्थळी आरोपींनी सीसीटीव्ही कॅमेरे आणि संरक्षण भिंतीचे काम सुरू असताना तोडफोड केली. कॅमेरे व संरक्षण भिंतीचे साहित्य चोरुन नेले. फिर्यादीसह त्यांच्या नातेवाईकांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, एक कोटी रुपयांची खंडणी मागून, पैसे न दिल्यास शेताची जमीन वाजवी पद्धतीने वापरू देणार नाही, अशी धमकी दिली.
आरोपींची नावे
आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत:
- शांतीलिंग रंगनाथ कुंभार
- गौतम रंगनाथ कुंभार
- रंगनाथ दत्तु कुंभार
- सिध्दलिंग दत्तु कुंभार
- रमेश सिध्दलिंग कुंभार
- विनोद सिध्दलिंग कुंभार
- संतोष सिध्दलिंग कुंभार
- प्रितिश शांतीलिंग कुंभार
- किशोर संतोष कुंभार
- आणि इतर इसम
या घटनेवरून येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींवर भारतीय दंड विधान कलम 308(2), 329(1), 303(2), 189(2), 191(2), 191(3), 190, 115(2), 352, 351(2)(3), 324(4)(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.पुढील तपास येरमाळा पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.