या संपूर्ण प्रकाराकडे उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. डीजेच्या आवाजाची मर्यादा स्पष्ट असताना, त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले. ठरलेल्या नियमांपेक्षा कितीतरी पट अधिक आवाजात डीजे वाजवला जात असतानाही पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही, ही बाब अधिक खटकणारी ठरली आहे.
शहरातील अनेक नागरीकांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला असून, सार्वजनिक ठिकाणी आणि धार्मिक उत्सवांमध्ये अशा असभ्य वर्तनाला मुभा देणं अत्यंत धोकादायक असल्याचं मत नोंदवलं आहे.
सांस्कृतिक व धार्मिक परंपरा जपण्याच्या नावाखाली बेशिस्त आणि अमर्याद वागणूक सहन केली जाणार नाही, असा इशारा समाजातील सुजाण नागरिकांनी दिला असून, पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहावे आणि पुढील काळात अशी घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी मागणीही होत आहे.